मैदानात येणार हेड कोच; क्रिकेटच्या ‘या’ पाच नियमांमध्ये बदल; ICC ने दिली मंजुरी
5 New Rules In International Cricket : आयसीसीने मोठा निर्णय घेत क्रिकेटच्या पाच नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलानंतर आता क्रिकेटच्या मैदानात
5 New Rules In International Cricket : आयसीसीने मोठा निर्णय घेत क्रिकेटच्या पाच नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलानंतर आता क्रिकेटच्या मैदानात ‘ड्रिंक्स ब्रेक’च्या वेळी हेड कोचला जाण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये रेड बॉलसह पिंक बॉल देखील वापरता येणार आहे. 31 मे रोजी अहमदाबाद येथे पार पडलेल्या बैठकीत आयसीसीने या बदलांना अधिकृतपणे मंजुरी दिली आहे.
T20 सामन्यांमध्ये ब्रेक टाईम 15 मिनिटे
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, आता टी20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) दोन डावांमधील ब्रेक टाईम कमी करण्यात आले आहे. आता टी20 सामन्यात ब्रेक टाईम फक्त 15 मिनिटे असणार आहे. यापूर्वी दोन डावांमधील ब्रेक टाईम 20 मिनिटे होता. या बदलामुळे सामने कमी वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.
मुख्य प्रशिक्षकांना मैदानात जाण्याची परवानगी
नवीन नियमांनुसार (ICC New Rules) आता आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील डिंक्स ब्रेकच्या वेळी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाला खेळाडूंशी संवाद साधण्यासाठी मैदानात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ राखीव खेळाडूंनाच मैदानात पाणी किंवा इतर पेये नेण्याची परवानगी होती मात्र आता मुख्य प्रशिक्षक देखील डिंक्स ब्रेकच्या वेळी मैदानात जाऊन खेळाडूंशी संवाद साधू शकणार आहे.
Big decisions after the ICC Board meeting in Ahmedabad.
Details ⬇️https://t.co/JvTRR94Dsz
— ICC (@ICC) June 1, 2026
कसोटी सामन्यांमध्ये पिंक बॉल
या बैठकीत आयसीसीने कसोटी क्रिकेटसाठी मोठा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार, जर खराब लाईटमुळे एखादा सामना थांबवावा लागला तर अंपायरच्या संमतीने रेड बॉलच्या जागी पिंक बॉल ने सामना पुढे सुरु ठेवता येणार आहे. आयसीसीच्या या निर्णयाचा फायदा मोठ्या प्रमाणात कसोटी क्रिकेटला होण्याची शक्यता आहे.
‘लेग-साईड वाईड्स’ बाबतचा नियम
आयसीसीच्या बैठकीदरम्यान, ‘लेग-साईड वाईड्स’ संदर्भातही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आता, जर गोलंदाजाने टाकलेला चेंडू लेग-साईडच्या दिशेने गेला, तर तो आपोआप ‘वाईड’ घोषित केला जाणार नाही. आता यासाठी एक विशिष्ट मार्गदर्शक रेषा किंवा निकष निश्चित केला जाईल आणि या निकषाच्या आधारे पंच ‘वाईड’बाबतचा निर्णय घेतील. तूर्तास, हा नियम प्रायोगिक तत्त्वावर लागू केला जाईल.
‘हॉक-आय’ तंत्रज्ञानाचा वापर
अहमदाबाद येथे झालेल्या आयसीसीच्या या बैठकीत गोलंदाजांच्या शैलीबाबत देखील मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता सामना अधिकाऱ्यांना हॉक-आय डेटा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याच्या मदतीने अंपायर गोलंदाजीच्या ॲक्शनचे सूक्ष्म परीक्षण करू शकतील.
पश्चिम बंगालमध्येही शिंदे फॉर्म्युला? दिदींच्या TMC त फुटीचे संकेत-