… तर वैभव सूर्यवंशीवर येणार बंदी ; श्रीलंकेच्या खेळाडूशी झालेल्या वादानंतर ICC करणार कारवाई? जाणून घ्या नियम

Vaibhav Suryavanshi  :  भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरु असणाऱ्या ट्राय नेशन ए सिरीजमध्ये भारतीय ए आणि श्रीलंका ए दरम्यान

Vaibhav Suryavanshi 

Vaibhav Suryavanshi  :  भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरु असणाऱ्या ट्राय नेशन ए सिरीजमध्ये भारतीय ए आणि श्रीलंका ए दरम्यान झालेल्या सामना सोशल मीडियावर चांगलाचं चर्चेत आहे. भारतीय खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये झालेल्या वादानंतर हा सामना सोशल मीडियावर चर्चेत आहे. या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये श्रीलंका ए संघाने बाजी मारली आहे मात्र या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीचा श्रीलंकेच्या एका खेळाडूशी वाद झाला.  या वादात दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना धक्का-बुक्की केली त्यामुळे आयसीसी दोन्ही खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई करु शकतो.

वैभव सूर्यवंशीवर बंदी ?

ही घटना आयसीसीच्या आचारसंहितेतील (Code of Conduct) कलम 2.12 च्या कक्षेत येऊ शकते. सध्या तरी सामनाधिकारी (Match Referee) प्रदीप जयप्रकाशधरन यांच्याकडून कोणताही अधिकृत निर्णय आलेला नाही. जर तपासात असे निष्पन्न झाले की वैभवने (Vaibhav Suryavanshi) दुसऱ्या खेळाडूशी अयोग्य शारीरिक संपर्क साधला होता, तर त्याला दंड किंवा इतर शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

 कलम 2.12 काय?

आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.12 नुसार, जर एखाद्या खेळाडूने मुद्दाम, निष्काळजीपणे किंवा चुकून दुसऱ्या खेळाडूला किंवा अधिकाऱ्याला धक्का दिला, धडक दिली किंवा धडक झाली, तर कारवाई केली जाऊ शकते.

तर दुसरीकडे आयसीसी ‘ए’ संघांच्या मालिकांशी संबंधित शिस्तभंगाच्या प्रकरणांवर निर्णय घेत नाही किंवा अशा मालिकांसाठी सामनाधिकारीही नियुक्त करत नाही. त्यामुळे वैभववर बंदी येण्याची शक्यता कमी असली, तरी जर आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप केला, तर ‘लेव्हल 1’ च्या गुन्ह्यासाठी त्याला ताकीद मिळू शकते आणि त्याच्या सामना शुल्काच्या (Match Fee) 50 टक्क्यांपर्यंत दंड होऊ शकतो.

बंदी कधी घातली जाते?

जर एखाद्या खेळाडूने 24 महिन्यांच्या (दोन वर्षांच्या) कालावधीत एकूण चार ‘डिमेरिट पॉइंट्स’ (Demerit Points) जमा केले, तर आयसीसीच्या नियमांनुसार त्याला बंदीला सामोरे जावे लागते. या मालिकेत आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात वैभव सूर्यवंशीने  अनुक्रमे 14, 44 आणि 21 धावा केल्या आहेत.

follow us