टीम इंडिया मैदानात! आज ऑस्ट्रेलियाला देणार टक्कर; जाणून घ्या, प्लेइंग-11

टीम इंडिया मैदानात! आज ऑस्ट्रेलियाला देणार टक्कर; जाणून घ्या, प्लेइंग-11

IND vs AUS : विश्वचषक स्पर्धेआधी आजपासून टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज मोहाली (पंजाब) येथे दुपारी 1.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. विश्वचषकाआधी होणारी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका दोन्ही संघासाठी चाचणी परीक्षा ठरणार आहे. वर्ल्डकपसाठी तयारी करण्याची संधीही या मालिकेतून दोन्ही संघांना मिळणार आहे. चार वर्षांनंतर टीम इंडिया या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाला टक्कर देणार आहे. या मैदानावर याआधी दोन्ही संघात झालेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेला दुहेरी झटका; ‘हे’ दोन प्रमुख खेळाडू संघातून बाहेर

निवड समितीने वर्ल्डकपआधी पाच खेळाडूंना विश्रांती दिली आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आण कुलदीप यादव यांना मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतून विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांचा विचार केला तर ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे. दोन्ही संघात एकूण 14 मालिका खेळल्या गेल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 4 तर भारताने 6 मालिका जिंकल्या आहेत. या दोघांत 11 मालिका भारतात खेळल्या गेल्या आहेत, यामध्ये ऑस्ट्रेलियाने 6 आणि भारताने 5 मालिकांत यश मिळवले आहे. पीसीए खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली आहे. वेगवान गोलंदाजांनाही येथे मदत मिळू शकते.

दोन्ही संघातील संभाव्य प्लेइंग 11

भारत

केएल राहुल (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, जसप्रित बुमराह, शमी, सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Asian Games 2023 : टीम इंडियाच! मलेशियाला पराभवाची धूळ चारत सेमी फायनलमध्ये धडक

ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स केरी, मार्कस स्टॉइनिस, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, अॅश्टन एगर.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube