IND vs AUS : जबरदस्त! ऑस्ट्रेलियाला धक्का देत भारताचा पर्थमध्ये ऐतिहासिक विजय
IND vs AUS : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने (Team India) शानदार कामगिरी करत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला (IND vs AUS) विजयासाठी 534 धावांचे लक्ष्य दिले होते मात्र ऑस्ट्रेलिया फक्त 238 धावा करू शकला आणि भारताने सामना 295 धावांनी जिंकला.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध या सामन्यात पहिल्या दिवसाचे दोन सत्र वगळता प्रत्येक सत्रात ऑस्ट्रेलिया विरूध्द भारी खेळला. ऑस्ट्रेलियाच्य दुसऱ्या डावात भारताकडून बुमराह आणि सिराज शानदार कामगिरी करत प्रत्येकी 3-3 विकेट घेतले तर वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट घेतले. तर ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) दुसऱ्या डावात 89 धावांची खेळी केली आणि मिचेल मार्शने 47 आणि ॲलेक्स कॅरीने 36 धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथने 17 धावांची खेळी केली.
भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 150 धावांवर ऑलआऊट झाला होता त्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात पुन्हा एकदा कमबॅक केला. पहिल्या डावात बुमराहने 18 षटकात केवळ 30 धावा देत 5 विकेट घेतले तर हर्षितने 48 धावांत 3 विकेट घेतले आणि सिराजने घातक स्पेल टाकत 2 विकेट घेतले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ केवळ 104 धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियाच्या 7 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
📸 📸 𝙋𝙞𝙘𝙩𝙪𝙧𝙚 𝙋𝙚𝙧𝙛𝙚𝙘𝙩 𝙋𝙚𝙧𝙩𝙝 🥳
Scorecard – https://t.co/gTqS3UPruo#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/3ewM5O6DKs
— BCCI (@BCCI) November 25, 2024
पहिल्या डावाच्या जोरावर 46 धावांची आघाडी घेतलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावाची सुरुवात जबरदस्त केली. जैस्वाल आणि केएल राहुलने पहिल्या विकेटसाठी 201 धावांची ऐतिहासिक भागीदारी केली.
A brilliant fightback from India in the opening fixture of the Border-Gavaskar Trophy, defeating the Australians at Perth. A fantastic all-round display by the Indian team, as everyone stepped up and contributed towards the victory! A loud cheer for @Jaspritbumrah93 who rose to… pic.twitter.com/UOTNPnphtW
— Jay Shah (@JayShah) November 25, 2024
यशस्वी जैस्वालने 161 धावांची खेळी खेळली तर विराट कोहलीनेही कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक झळकावले. या दोघांशिवाय केएल राहुलने 77 धावांची आणि नितीश रेड्डीने 38 धावांची खेळी खेळली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना 06 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.