IND vs AUS WTC Final 2023: पहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, धावांचा डोंगर उभारला

  • Written By: Published:
UPSC Exam (7)

IND vs AUS WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना भारत ( India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. पाहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 85 षटकांत 3 गडी गमावून 327 धावा केल्या होत्या.

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना सामन्यात भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

कॉमेडियन भारती सिंग आणि तिच्या पतीला दिलासा, कोर्टाने NCB ची याचिका फेटाळली

भारतीय गोलंदाजांनी केवळ 76 धावांत ऑस्ट्रेलियाच्या टॉप-3 फलंदाजांना आपली शिकार बनवले होते. डेव्हिड वॉर्नर (43), उस्मान ख्वाजा (0) आणि मार्नस लबुशेन (26) बाद झाले. सिराज, शमी आणि शार्दुल यांना 1-1 यश मिळाले होते. येथून असे वाटत होते की भारतीय संघ लवकरच सामन्यावर आपली पकड घट्ट करेल आणि ऑस्ट्रेलियाचा संघ 250 किंवा 300 च्या धावसंख्येपर्यंत पोहचेल.

पण क्रीझवर उतरलेल्या माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचे इरादे वेगळेच होते. या मैदानावर त्याचा जबरदस्त रेकॉर्ड आहे. यामुळेच भारतीय संघाने सामन्यापूर्वी स्मिथविरुद्ध सर्वाधिक तयारी केली होती. पण ही तयारी कामी आली नाही आणि ज्याची भीती होती तेच झाले. स्मिथने क्रीझवर पाय रोवले आहेत.

ट्रॅव्हिस हेडने 156 चेंडूत 146 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ 95 धावा करून नाबाद राहिला. तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नर 43 आणि लबुशेन 26 धावांवर बाद झाले. उस्मान ख्वाजा शून्यावर बाद झाला. भारताकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी 1-1 बळी घेतला.

Tags

follow us