IND vs AUS, WTC Final 2023: ऑस्ट्रेलियाला 469 धावांवर रोखले ! सिराजचा घातक मारा

  • Written By: Published:
IND vs AUS, WTC Final 2023:  ऑस्ट्रेलियाला 469 धावांवर रोखले ! सिराजचा घातक मारा

WTC Final 2023, India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया  यांच्यात लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवसाच्या खेळात 469 धावांवर आटोपला. कांगारू संघासाठी पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) सर्वाधिक 163 धावांची खेळी केली, तर स्टीव्ह स्मिथची (Steven Smith) 121 धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) सर्वाधिक 4 बळी घेतले. (ind-vs-aus-wtc-final-2023-australia-made-469-runs-against-india-1st-innings-day-2-the-oval-stadium)

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या 3 गडी गमावून 327 धावा होती. यानंतर दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले आणि एकूण 4 बळी घेतले. त्यात ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथच्या प्रमुख विकेट्सचाही समावेश होता. दुसऱ्या दिवशी 163 धावा करून बाद झालेल्या ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने भारतीय संघाला पहिले यश मिळाले.

यानंतर टीम इंडियाला 376 च्या स्कोअरवर कॅमरून ग्रीनच्या रूपाने 5 वे यश मिळाले, जो केवळ 6 धावा करून मोहम्मद शमीचा बळी ठरला. स्टीव्ह स्मिथच्या रूपाने भारतीय संघाला 387 धावांवर सहावी विकेट मिळाली. 121 धावांची उत्कृष्ट खेळी खेळून स्मिथ पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिले सत्र संपण्यापूर्वी भारतीय संघाला 7वी विकेट मिचेल स्टार्कच्या रूपाने मिळाली, जो 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Steve Smith Century: WTC फायनलमध्ये स्मिथने झळकावले शतक, भारताविरुद्ध रचला इतिहास

अॅलेक्स कॅरीने 48 धावांची खेळी केली, तर मोहम्मद सिराजने 4 बळी घेतले

ऑस्ट्रेलियासाठी खालच्या फळीतील यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीने 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाची धावसंख्या 450 च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कॅरीने कर्णधार पॅट कमिन्ससोबत 8व्या विकेटसाठी 51 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली. कांगारू संघाला 453 धावांवर आठवा धक्का बसला. यानंतर संघाची धावसंख्या 469 अशी झाली.

पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूरने 2-2 तर रवींद्र जडेजाने 1 बळी घेतला.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube