IND vs ENG : टीम इंडियासाठी गुडन्यूज! तिसऱ्या सामन्यात ‘या’ खेळाडूचे कमबॅक

IND vs ENG : टीम इंडियासाठी गुडन्यूज! तिसऱ्या सामन्यात ‘या’ खेळाडूचे कमबॅक

IND vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs ENG Test Series) उद्यापासून राजकोट येथे सुरू होत आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाच्या खेळाडूंना (Team India) दुखापतींनी ग्रासले आहे. विराट कोहली पूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. केएल राहुलही संघात नाही. रवींद्र जडेजाही नाही. श्रेयस अय्यरही (Shreyas Iyer) संघाबाहेर पडला आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माचे टेन्शन (Rohit Sharma) वाढले आहे. महत्वाचे खेळाडू संघाबाहेर असल्याने अडचणी वाढल्या आहेत. आता मात्र दिलासा देणारी बातमी आली आहे. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

जडेजा उद्यापासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी जोरदार सराव करत आहेत. आता तो पूर्णपणे फिट झाला असून तिसऱ्या सामन्यात खेळेल अशी परिस्थिती आहे. कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) याबाबत माहिती दिली आहे. पहिल्या कसोटी सामन्यावेळी जडेजाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीत खेळता आले नाही.

IND vs ENG: उर्वरित तीन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा, आकाश दीपला लॉटरी

यानंतर उर्वरित तीन सामन्यांसाठी संघाची घोषणा करण्यात आली. या संघात जडेजाचाही समावेश करण्यात आला. मात्र त्याला संघात यायचे असेल तर फिटनेस टेस्ट बंधनकारक करण्यात आली होती. त्याच्या फिटनेस टेस्टबाबत बीसीसीआयने (BCCI) अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. कुलदीप यादवने मात्र जडेजाच्या फिटनेसबाबत बातमी दिली आहे. त्यामुळे आता त्याची बातमी खरी ठरते की नाही हेही लवकरच स्पष्ट होईल.

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचा वैद्यकीय टीमकडून फिटनेस मंजुरी मिळाल्यानंतर समावेश केला जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. तर चौथी कसोटी 23 फेब्रुवारीपासून रांचीमध्ये खेळवली जाणार आहे.

उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रित बुमराह, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, आर. अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून)

इंग्लंडचा संघ

बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, ऑली पोप, बेन डकेट, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वूड, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स, गस अॅटकिन्सन.

IND vs ENG : श्रेयस-रोहितचं बॅडलक पण, यशस्वीचं झुंजार शतक; दुसऱ्या सामन्यात फलंदाजांचं वर्चस्व

follow us
  • fb
  • instagram
  • youtube