IND vs NEP: टीम इंडियासमोर 23 षटकांत 145 धावांचे सुधारित लक्ष्य
IND vs NEP: आशियाई चषक सामन्यांमध्ये आज भारत विरुद्ध नेपाळ सामना झाला. नेपाळच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात नेपाळने भारतासमोर 230 धावांचा डोंगर उभा केला आहे होता. त्यानंतर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला होता. आता सामना पुन्हा सुरू झाला असून आता भारतासमोर 23 षटकांत 145 धावांचे सुधारित लक्ष्य आहे
आशिया कप सामन्यात नेपाळने भारताला विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य दिले आहे. ऩेपाळननं दिलेलं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 2.1 ओव्हरमध्ये बिनबाद 17 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल नाबाद राहिले. त्यानंतर सामन्यात पुन्हा एकदा पावसाने एन्ट्री घेतली. पल्लेकेले क्रिकेट स्टेडियम, कॅंडी येथे हा सामना खेळला जात आहे.
नेपाळ संघाची कामगिरी-
आज भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात नेपाळच्या फलंदाजांनी आत्मविश्वासाने खेळ केला. सलामीवीर कुशल भुरटेल (38) आणि आसिफ शेख यांनी 65 धावांची भागीदारी केली. आसिफने 97 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. भारतीय खेळाडूंनी पहिल्या 5 षटकात 3 झेल सोडले. गुलशन झा (23) यांने चांगली खेळी केली. दीपेंद्र सिंग ऐरी (29) आणि सोमपाल कामी यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. सोमपालने 56 चेंडूत 48 धावा करत संघाला 230 धावांच्या समाधानकारक धावसंख्येपर्यंत नेले.
Udhayanidhi Stalin : ‘सनातन’ वक्तव्यावर उदयनिधी स्टॅलिन ठाम; म्हणाले, ‘मी पुन्हा-पुन्हा..,’
दरम्यान, हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर 4 साठी पात्र ठरेल. मात्र, या सामन्यात भारतीय संघ नेपाळपेक्षा बलाढ्य दिसत आहे. पण टीम इंडिया त्याला कोणत्याही किंमतीत हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. दोन्ही संघांनी आजपर्यंत एकही सामना खेळलेला नाही. नेपाळचा संघ प्रथमच आशिया कपमध्ये सहभागी होत आहे.