IND VS NZ : सेमीफायनलला पाऊस आल्यास काय? रिझर्व्ह डे की, डकवर्थ-लुईस रूल; जाणून घ्या…

IND VS NZ : सेमीफायनलला पाऊस आल्यास काय? रिझर्व्ह डे की, डकवर्थ-लुईस रूल; जाणून घ्या…

IND VS NZ : एकदिवसीय विश्वचषकाच्या (World Cup 2023) सेमीफायनलसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विश्वचषकातील पाहिला सेमीफायनल 15 नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. 16 नोव्हेंबरला दुसऱ्या सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.

Sharad Pawar यांच्यावर आरोप करणाऱ्या नामदेव जाधवांविरोधात लखोजीराव जाधवांचे वंशज मैदानात

या दोन्ही सामन्यातील विजयी संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळणार आहे. दरम्यान, चाहते फायनलची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी सेमीफायनल पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचेल, सेमीफायनलच्या दोन नवीन नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

रिझर्व्ह डे की, डकवर्थ-लुईस रूल…

सध्या मुंबईत पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे आयसीसीने विश्वषचक 2023 च्या सेमी फायनल्सच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवले आहेत. मात्र राखील ठेवलेल्या दिवशी देखील पाऊस झाल्यास काय असा प्रश्न सध्या क्रिडा चाहत्यांकडू विचारला जात आहे. त्यामुळे या सामन्या दरम्यान पाऊस पडल्यास दुसऱ्या दिवशी खेळ पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र तेव्हा देखईल ओव्हर्स कमी केल्या जाणार नाही.

Hiba Nawab: ‘झनक’ मालिकेत हिबा नवाब दिसणार अनोख्या अंदाजात!

तर डकवर्थ-लुईस पद्धतीने दुसऱ्या डावात आवश्यक तेवढी षटकं खेळली गेली. तर विजय किंवा पराभवाचा निर्णय होणार आहे. मात्र नियमासाठी आवश्यक षटकं देखील खेळली गेली नाही तर पॉईंट टेबलनुसार ज्यांची जी स्थान आहेत त्यानुसार विजेता संघ घोषित केला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान अशा प्रकारे पाऊस झाला आणि डकवर्थ-लुईस नियमासाठी आवश्यक षटकं देखील खेळली गेली नाही तर भारतीय संघाला याचा फायदा होणार आहे. कारण त्यांना तेथ अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे. कारण पॉईंट टेबलमध्ये भारतीय संघ न्यूझीलंडपेक्षा पुढे आहे. भारत पहिल्या तर न्यूझीलं चौथ्या स्थानावर आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube