IND vs SA : आज दुसरा सामना! भारतासाठी मालिका विजयाची संधी, आफ्रिकेसाठी करो या मरो

IND vs SA : आज दुसरा सामना! भारतासाठी मालिका विजयाची संधी, आफ्रिकेसाठी करो या मरो

IND vs SA 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना जिंकून भारतीय (IND vs SA 2nd ODI) संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. आज दुपारी दुसरा सामना होणार आहे. हा सामना जिंकून मालिका विजय साकारण्याचे टीम इंडियाचे उद्दीष्ट आहे. तर दुसरीकडे आफ्रिका संघासाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकून बरोबरी साधायची असा प्रयत्न आफ्रिकेच्या संघाचा राहणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय दमदार कामगिरी करत सामना जिंकला. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली. त्यानंतर आज दुसरा सामना होणार आहे. हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी भारताला आहे.

IND vs SA: टीम इंडियाला धक्का, इशान किशनही कसोटी मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला लागली ‘लॉटरी‘ 

एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) 8 गडी राखून पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 116 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने अवघे 2 गडी गमावून सामना जिंकला. प्रथम गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी घातक गोलंदाजी केली. त्यानंतर साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांनी तुफानी फलंदाजी केली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत फक्त 116 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 17 व्या षटकातच हे लक्ष्य गाठले.

जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय संघासाठी चांगलाच महागात पडला. पहिल्या डावात खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना मदत केली. सुमार फलंदाजी केल्याने फक्त 116 धावा करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना सहज जिंकला. यानंतर आज दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी तयारी केली आहे. आज दुपारी 4.30 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे.

IND vs SA ODI : गुलाबी जर्सीत दिसणार आफ्रिकेचे खेळाडू; क्रिकेट बोर्डाने कारणही सांगितलं

पहिल्या सामन्याचे पैसे कॅन्सर जनजागृतीसाठी 

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना जोहान्सबर्ग येथील न्यू वँडर्स स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाचे (South Africa) खेळाडू गुलाबी रंगाची जर्सी परिधान केलेले दिसले. या गुलाबी रंगाच्या जर्सी घालण्याचं कारण म्हणजे लोकांना ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरूक करणे होते. या सामन्यातून झालेला पैसा सुद्धा चॅरिटेबल ट्रस्टला देण्याचा निर्णय आफ्रिका क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube