भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, सूर्या ठरला ‘हिरो’

भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, सूर्या ठरला ‘हिरो’

राजकोट : भारत विरुद्ध श्रीलंका तीसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवलाय. या सामन्यात भारतीय संघानं 91 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतीय संघानं तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकानं आपल्या खिशात घातलीय. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच मालिकेत विजयश्री खेचून आणलाय.

भारतीय संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं. त्यामध्ये संघानं 229 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. त्यानंतर श्रीलंकन संघानं चांगली सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं मात्र पुढे ते कायम ठेवता आले नाही. भारतीय गोलंदाजांनी त्यांना 50 धावांच्या आतचं दोन झटके दिले. 44 धावांवर अक्षर पटेलने पहिला धक्का दिला. त्यानंतर अर्शदीपनं सहाव्या ओव्हरमध्ये श्रीलंकेला दुसरा धक्का बसला. पुढे 51 धावांवर हार्दिक पंड्यानं तीसरा बळी घेतला. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाची अवस्था 51 धावांवर 3 बाद अशी झाल्याची पाहायला मिळाली.

पुढे श्रीलंकन खेळाडू धनंजया डी सिल्वा आणि चारिथ असलंका यांच्याकडून डाव संभाळून घेण्याची अपेक्षा वाटत असतानाच युजवेंद्र चहलनं या दोघांना माघारी पाठवलं. 12 व्या ओव्हरमध्ये श्रीलंकेचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. भारतीय संघानं तगडं आव्हान दिलेलं होतं. पण मैदानावर श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका होता. दसुन एकटा सामना जिंकून देऊ शकतो याची भारतीय गोलंदाजांना कल्पना होतीच. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या बाजूने विकेट घेण्यास सुरुवात केली आणि तेथेच लंकेचा पराभव निश्चित झाला.

श्रीलंकेचा डाव 16.4 ओव्हरमध्ये 137 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून अर्शदीपनं सर्वाधिक 3, हार्दिक पंड्या, उमरान मलिक, चहल यांनी प्रत्येकी दोन तर अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सूर्यकुमार यादवने फक्त 51 चेंडूत 9 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 112 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 219.61 इतका होती. तर अक्षर पटेलने 9 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजीचा विचार केल्यास सर्वात कमी इकॉनमी होती ती 8.80 इतकी. पाच पैकी तिघा गोलंदाजांना 10 पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा काढल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube