IND vs SL : फक्त तीन दिवसांचा सामना; श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या वेळापत्रकात बदल
IND vs SL : भारत आणि श्रीलंकेत 15 ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात
IND vs SL : भारत आणि श्रीलंकेत 15 ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. तर आता या मालिकेपूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे. माहितीनुसार, या मालिकेपूर्वी भारतीय संघ चार दिवसांचा सराव सामना श्रीलंका इलेव्हनविरुद्ध खेळणार होता मात्र आता हा सामना फक्त तीन दिवसांचा असणार आहे. हा सराव सामना 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान कोलंबोमधील एनसीसी (NCC) मैदानावर खेळवला जाईल. हे मैदान दुसऱ्या कसोटीचे यजमान असलेल्या एसएससी (SSC) स्टेडियमच्या जवळच आहे. दरम्यान, भारतीय संघ 4 ऑगस्ट रोजी कोलंबोला रवाना होणार आहे.
संघाची निवड करताना बीसीसीआयने (BCCI) सुरुवातीला चार दिवसांच्या सराव सामन्याची घोषणा केली होती, परंतु आता संघाला या बदलाची माहिती देण्यात आली आहे. सामना कमी करण्यामागचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नाही. हा सराव सामना भारतासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
बुमराह आणि साई सुदर्शन फिटनेस अपडेट
भारतीय संघाच्या दौऱ्यापूर्वी दोन खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ‘क्रिकबझ’च्या (Cricbuzz) वृत्तानुसार, साई सुदर्शन (Sai Sudharsan) पायाच्या बोटाच्या दुखापतीमुळे बेंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जात होता. आता तो बरा होत असून त्याने फलंदाजीचा सरावही सुरू केला आहे. संघ रवाना होण्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. तर गुडघ्याच्या समस्येमुळे जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) निवडही तंदुरुस्तीच्या अटींवर करण्यात आली होती. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्याच्या मार्गावर तोही आहे.
Sri Lanka Cricket has said the Shubman Gill-led Indian team will play a 3-day warm-up game instead of the originally scheduled four-day fixture.
The warm-up fixture will commence on August 7 at the NCC Grounds, Colombo.
The India team is scheduled to arrive in Sri Lanka on… pic.twitter.com/WNTeUhQtrl
— IANS (@ians_india) August 1, 2026
टीम इंडियाचा श्रीलंका दौरा
3-दिवसीय सराव सामना: 7-9 ऑगस्ट (एनसीसी मैदान, कोलंबो)
पहिली कसोटी: 15 ऑगस्टपासून सुरुवात (गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियम)
दुसरी कसोटी: 23 ऑगस्टपासून सुरुवात (एसएससी स्टेडियम, कोलंबो)
शानदार, जबरदस्त, भारताने एका दिवशी पटकावली 16 पदके; बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्णपदके
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ:
शुभमन गिल (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.