IND vs SL : भारतीय संघ श्रीलंकेशी भिडणार; 5 सामन्यांच्या टी20 मालिकेची घोषणा

INDvsSL : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर आता भारतीय संघ पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशचा

  • Written By: Published:
IND Vs SL

INDvsSL : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर आता भारतीय संघ पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशचा दौरा रद्द झाल्यानंतर बीसीसआयने श्रीलंकेविरुद्ध नवीन मालिकेची घोषणा केली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेविरुद्ध पाच टी20 मालिकेची सुरुवात 21 डिसेंबरपासून होणार आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या मालिकेसाठी बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले आहे. 21 ते  30 डिसेंबर दरम्यान विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम येथे हे सामने खेळवले जातील.

यापूर्वी डिसेंबरमध्ये भारतीय महिला संघ (Indian Women Team) बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार होता मात्र दोन्ही देशांमध्ये राजकीय तणाव वाढत असल्याने ही मालिका रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. तर आता डिसेंबरमध्ये भारतीय महिला संघ श्रीलंकेविरुद्ध (INDvsSL) पाच टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

या मालिकेची सुरुवात 21 डिसेंबरपासून विशाखापट्टणम येथे होणार आहे. तर दुसरा सामना 23 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. तर 26 डिसेंबर रोजी तिसरा सामना, 28 डिसेंबर रोजी चौथा सामना आणि पाचवा टी20 सामना 30 डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे होणार आहे.

2026 च्या टी20 विश्वचषकाची तयारी

श्रीलंकेविरुद्धची मालिका ही जूनमध्ये होणाऱ्या 2026 च्या टी20 विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात असेल. अलिकडेच एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर, भारत टी20 विश्वचषकाच्या जेतेपदावर लक्ष केंद्रित करेल.  2024 मध्ये झालेल्या या स्पर्धेच्या शेवटच्या आवृत्तीत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करून भारतीय महिला संघ लवकर बाहेर पडला होता. तेव्हापासून, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने पुढील दोन मालिकांमध्ये वेस्ट इंडिज (2-1) आणि इंग्लंड (3-2) यांचा पराभव केला आहे. टी20 विश्वचषकापूर्वीच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारत ऑस्ट्रेलिया (फेब्रुवारी 2026) आणि इंग्लंड (मे 2026) यांचा सामना करेल.

जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

follow us