मोठा निर्णय: बीसीसीआयने स्वीकारले पाकिस्तानचे निमंत्रण

मोठा निर्णय: बीसीसीआयने स्वीकारले पाकिस्तानचे निमंत्रण

ASIA CUP 2023 : येत्या 30 ऑगस्टपासून आशिया चषक 2023 (ASIA CUP 2023) सुरू होत आहे. या स्पर्धेतील 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. पण, याआधी मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाठवलेले निमंत्रण स्वीकारले असून बीसीसीआयचे अधिकारी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना पाहण्यासाठी पाकिस्तानला जाणार आहेत.

बीसीसीआयचे अधिकारी पाकिस्तानला भेट देणार
गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आशिया चषक 2023 च्या उद्घाटन सामन्यासाठी आमंत्रण पाठवल्याच्या बातम्या येत होत्या. पण, त्यात सहभागी होण्यासाठी बीसीसीआयचे अधिकारी पाकिस्तानात जाणार की नाही? हा प्रश्न सर्वांच्याच मनात होता.

आता या प्रकरणातील एक मोठे अपडेट समोर आले आहे की रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया कप 2023 च्या अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना पाहण्यासाठी जाणार आहेत. रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला 4 सप्टेंबरला रवाना होणार आहे तर 7 सप्टेंबरला परतणार आहेत.

पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार? राज्यपालांनी दिला मुख्यमंत्र्यांना इशारा

बीसीसीआयचे अधिकारी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाहीत, अशी अटकळ बांधली जात होती. पण, आता त्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या असून ते या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

भारत आणि पाकिस्तान सामना होणार शानदार
30 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना 2 सप्टेंबर रोजी कॅंडी येथे खेळवला जाईल. या शानदार सामन्यात रोहित शर्मा आणि कंपनीला विजयाची नोंद करून स्पर्धेची विजयी सुरुवात करायची आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube