बाहेर काहीही चर्चा असल्या तरी माझं अन् रोहितच नातं… कर्णधार गिलचं एकदिवसीय मालिकेपूर्वी मोठं वक्तव्य
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय टीमचा कर्णधार शुभमन गिलंने रोहित शर्मा आणि विरोट कोहलीसोबतच्या नात्यावर भाष्य केलं.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका उद्यापासून सुरु होणार आहे. (Shubhaman) या मालिकेत भारताचं कर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात आहे. अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय संघाचा भाग असतील. रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पहिल्यांदा भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहेत. या दोघांसोबत नातं कसं आहे, यावर शुभमन गिलनं भाष्य केलं आहे.
सोशल मीडियावर विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यातील संबंधाबाबत काही दिवसांपासून अनेक दावे केले जात होते.रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघं शुभमन गिलसोबत बोलत नाहीत, असा दावा देखील केला जात होता. यावर शुभमन गिलनं प्रतिक्रिया दिली आहे. शुभमन गिल म्हणाला की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत संबंध पहिल्यासारखे मजबूत आहेत, अडचण आल्यास त्या दोघांचा सल्ला घेण्यास मागं पुढं पाहणार नाही, असं त्याने यावेळी बोलताना म्हटलं आहे.
Afghanistan Cricketers : पाकच्या हल्ल्यात ठार झालेले तीन खेळाडू होते अफगाण क्रिकेटसंघाचं भविष्य
बाहेर काही चर्चा सुरु असल्या तरी रोहित शर्मा सोबत माझं नातं बदललं नाही. जेव्हा मला मदतीची गरज असेल तेव्हा तो नेहमीच उपलब्ध असतो. पिच संदर्भात काही माहिती घ्यायची असेल किंवा काहीही मी त्याला जाऊन विचारतो, तुम्हाला काय वाटतं, जर तुम्ही कर्णधार असता तर काय केलं असतं. विराट भाई आणि रोहित भाई यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, ते सल्ला देतात, असं शुभमन गिल म्हणाला.
विराट भाई आणि रोहित भाईसोबत टीमला पुढं घेऊन जाण्यासंदर्भात खूप चर्चा केली आहे. ते कोणत्याही प्रकारे टीमला पुढं घेऊन जाऊ पाहत होते याचा अनुभव आणि धडा यामुळं आम्हाला खूप फायदा होईल. महेंद्रसिंह धोनी, विराट भाई, रोहित शर्मानं जो वारसा निर्माण केला आहे, त्यांचा अनुभव, कौशल्य टीमसाठी खूप महत्त्वाचा आहे, असं गिलनं म्हटलं.