कोहली-बुमराहचे कमबॅक ! शतक झळकावूनही यशस्वी ‘आऊट’ ; इंग्लंड दौऱ्यासाठी वनडे संघाची घोषणा

India’s ODI squad-काल अफगाणिस्तानविरुद्धच्या अखेरच्या वनडेमध्ये शानदार शतक झळकावूनही युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला संघात जागा मिळू शकली नाही.

  • Written By: Published:
India Squad For England Tour

India’s ODI squad for the England tour: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी रविवारी (21 जून) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांचे संघात पुनरागमन झाले आहे. 14 जुलै ते 19 जुलैदरम्यान ही मालिका होणार आहे.

काल अफगाणिस्तानविरुद्धच्या अखेरच्या वनडेमध्ये शानदार शतक झळकावूनही युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला संघात जागा मिळू शकली नाही. तसेच, अफगाणिस्तान मालिकेत वनडेत पदार्पण करणारे हर्ष दुबे आणि प्रिन्स यादव यांनाही संघात घेण्यात आलेले नाही. तर ऑलराऊंडर अक्षर पटेलचे भारतीय संघात पुनरागमन झालाय. याशिवाय हर्षित राणा याला संघात स्थान देण्यात आले आहे.

हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी संघाबाहेर…
हार्दिक पंड्या अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे निवड समितीने त्याचा विचार केला नाही. तर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांचे नाव पुन्हा एकदा संघातून वगळण्यात आलय.

…तर मी 2022 लाच एकनाथ शिंदेंसोबत गेलो असतो; ओमराजे निंबाळकरांनी वडिलांचा हत्या निकाल अन् पक्षांतरावर सगळच सांगितलं


वनडे मालिकेसाठी संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली (तंदुरुस्तीवर अवलंबून) श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि गुरनूर बरार


पोस्ट ऑफिसची सुपरहिट योजना ! दोन लाखांवर 90 हजारांचे व्याज कसे मिळेल ?


भारत-इंग्लंड वनडे मालिकेचे वेळापत्रक

मंगळवार-14 जुलै 2026-दुपारी 3:30-पहिली वनडे-एजबॅस्टन
गुरुवार-16 जुलै 2026-सायंकाळी 5:30-दुसरी वनडे-सोफिया गार्डन्स
रविवार 19 जुलै 2026-दुपारी 3:30-तिसरा वनडे-लॉर्ड्स


टी-20 संघातून वरुण चक्रवर्ती बाहेर

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या भारतीय संघातून फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याला दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे. तो सध्या दुखापतीनंतर बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसनाच्या अंतिम टप्प्यात असून, याबाबतची माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


आयर्लंड दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि प्रिन्स यादव.

follow us