भारतीय महिला संघाने पाकिस्तानला पाणी पाजलं; 64 धावांनी नमवत दिली विजयी सलामी

सलामीवीर स्मृती मानधनाचे शानदार अर्धशतक आणि अखेरच्या षटकांमध्ये रिचा घोषने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने विजयी सलामी दिली आहे.

News Photo   2026 06 14T223533.854

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक (T20) 2026 मधील ग्रुप ‘ए’ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तान महिला संघाचा 64 धावांनी पराभव केला. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर रंगलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर स्मृती मानधनाचे शानदार अर्धशतक आणि अखेरच्या षटकांमध्ये रिचा घोषने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने विजयी सलामी दिली आहे. निर्धारित 20 षटकांत 6 बाद 170 धावांची धावसंख्या उभारली होती.

दीप्ती शर्माने एकाच षटकात तीन विकेट काढल्या आणि पाकिस्तानला पराभवाचा दणका दिला. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पाकिस्तानचा संघ 106 धावा करू शकला. भारताने पाकिस्तानला 64 धावांनी पराभूत केलं. दीप्ती शर्माने आलिया रियाज, तास्मिया रुबाब आणि नाशरा संधूची विकेट काढली. 17 षटकाच्या दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट काढली.

follow us