IPL 2023 PBKS vs RCB: आरसीबीचे पंजाबसमोर 175 धावांचे आव्हान

  • Written By: Published:
IPL 2023 PBKS vs RCB: आरसीबीचे पंजाबसमोर 175 धावांचे आव्हान

IPL 2023 PBKS vs RCB:  आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 27 वा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 174 धावा केल्या. आरसीबीसाठी फाफ डू प्लेसिसने 84 तर विराट कोहलीने 59 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

आरसीबीची धावसंख्या 15 षटकांत एकही विकेट न गमावता 130 धावा होती. त्यानंतर आरसीबी आरामात 190-200 च्या जवळ पोहोचेल असे वाटत होते, परंतु अखेरच्या षटकांनमध्ये पंजाबने शानदार गोलंदाजी करत आरसीबीला 174 धावांवर रोखले.

क्रिकेट विश्वात खळबळ; फिक्सिंगसाठी भारताच्या ‘स्टार’ खेळाडूला मोठी ऑफर

पंजाबकडून हरप्रीत ब्रार ने 2 विकेट पटकावला तर अर्शदीप सिंग आणि नॅथन एलिस प्रत्येकी 1 – 1 विकेट घेतली.

आरसीबीने पहिल्या 6 षटकात बिनबाद 59 धावा केल्या

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाब किंग्ज संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने आरसीबीकडून कर्णधारपदाची धुरा सांभाळली, तर फॅफ डू प्लेसिसला impact player म्हणून खेळवण्यात आले. कोहली आणि डु प्लेसिस या सलामीच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या 6 षटकात बिनबाद 59 धावा केल्या.

आरसीबीची धावसंख्या 15 षटकांत 130 धावांपर्यंत पोहोचली

चांगली सुरुवात केल्यानंतर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस पंजाब किंग्जच्या गोलंदाजांविरुद्ध फटकेबाजी करत वेगवान धावा काढल्या. या दोघांनी 10 षटकांत धावसंख्या 91 धावांवर नेली. फाफ डू प्लेसिसने मोसमातील चौथे अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या टोकाला फलंदाजी करणारा विराट कोहली हळू खेळला. 15 षटकांच्या अखेरीस आरसीबी संघाने बिनबाद 130 धावा केल्या होत्या.

शेवटच्या 5 षटकात विकेट गमावल्याने धावगतीचा वेग कमी झाला आणि धावसंख्या 174 पर्यंत पोहोचली.

आरसीबीच्या संघाला या सामन्यात पहिला धक्का विराट कोहलीच्या रूपाने 137 धावांवर बसला, जो 47 चेंडूत 59 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी फलंदाजीला आल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. 151 धावांवर 56 चेंडूत 84 धावांची खेळी करत फाफ डू प्लेसिस हरप्रीत ब्रारचा बळी ठरला. आरसीबी संघाला शेवटच्या 5 षटकात केवळ 44 धावा करता आल्या, तर संघाने 4 विकेट्सही गमावल्या.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube