अकरा लढती, आठ संघ अन् प्लेऑफसाठी जोरदार रस्सीखेच ! नेमकी समीकरण आहे तरी कसं ?

IPL 2026-तर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हे संघ सर्वात मजबूत स्थितीत आहेत. तर चेन्नई, कोलकाता,दिल्ली कॅपिटल्स यांचा मार्ग खूपच कठीण.

  • Written By: Published:
Ipl Plyoff

IPL 2026 Playoff Scenarios : आयपीएलच्या (IPL) यंदाच्या हंगामात केवळ 11 सामने शिल्लक आहेत. परंतु अद्याप कोणत्याही संघाने अधिकृतपणे प्लेऑफमध्ये (Playoff) धडक मारलेली नाही. अव्वल चार स्थानांसाठीच्या शर्यतीत आठ संघ आहेत. तर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हे संघ सर्वात मजबूत स्थितीत आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा मार्ग खूपच कठीण झाला आहे.

गुजरात टायटन्स आयपीएलच्या प्लेऑफमध्ये ?
गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हे मजबूत स्थितीत आहेत. या दोन्ही संघाचे समान 16 पाँइट असून, पाँइट टेबलमध्ये टॉपवर आहेत. गुजरातचा रनरेट चांगला आहे. गुजरात टायटन्सने सलग पाच सामने जिंकले आहेत. आता एक लढत जिंकल्यानंतर हा संघ प्ले ऑफमध्ये दाखल होईल. तर उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास टॉप दोनममध्ये हा संघ असणार आहे. दोन्ही लढती हरल्यास नेट रन रेट (NRR)वर अवलंबून राहावे लागणार आहे. पण चेन्नई, राजस्थानच्या संघाने उर्वरित सामने जिंकल्यास पाच संघाचे 16 पाँइट होईल. तर पंजाबचे तेरा पाँइट असून, दोन सामने जिंकल्यास 17 पाँइट होऊन हा संघ पात्र ठरेल. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुला केवळ 1 विजय हवा आहे. दोन्ही सामने जिंकल्यास टॉप-2 मध्ये स्थान निश्चित होईल. मात्र, त्यांचे उर्वरित दोन्ही सामने घरच्या मैदानावर नाहीत. बाहेरच्या मैदानावर त्यांची कामगिरी या मोसमात खराब राहिली आहे.

सनरायझर्स हैदराबादचे नशीब स्वतःच्या हातात
हैदराबादचे 14 पाँइट असून, हा संघ 12 लढती खेळला आहे. उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास हा संघ प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित होईल. दोन्ही सामने गमविल्यास ते 14 पाँइट राहिले, तर त्यांना पंजाब (PBKS) आणि राजस्थान (RR) च्या पराभवावर अवलंबून राहावे लागेल. तर पंजाब आणि राजस्थान सर्व मॅच हरल्यास हैदराबाद नेट रनरेटशिवाय प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

पंजाब किंग्स
स्वतःची कामगिरीच तारणार. समीकरण : 12 सामन्यात 13 गुण. जर पंजाबने उर्वरित दोन्ही सामने जिंकले, तर ते 17 गुणांसह थेट पात्र होतील. लखनौच्या पराभवामुळे पंजाबचे नशीब आता त्यांच्या स्वतःच्या हातात आहे. मात्र, ते 15 गुणांवर थांबले, तर त्यांना इतर संघांच्या निकालाची वाट पाहावी लागेल. 13 गुणांवरही ते पात्र होऊ शकतात, पण त्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची समीकरणे जुळून यावी लागतील.

राजस्थान रॉयल्ससाठी ‘करा किंवा मरा’ स्थिती
या संघाचे 11 सामन्यात 12 पाँइट आहेत. हा संघ गेल्या 7 पैकी 5 सामने हरल्यामुळे राजस्थानची स्थिती वाईट आहे. उर्वरित 3 सामने जिंकल्यास त्यांचे तिकीट पक्के होईल. त्यांचे पुढचे सामने तुलनेने कमकुवत किंवा स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघांशी आहेत. परंतु एक पराभवही राजस्थानला स्पर्धेतून बाहेर फेकेल. स्पर्धेच्या सुरुवातीला हा संघ तिसऱ्या स्थानावर होता. परंतु आता पाचव्या स्थानावर गेला आहे.

चेन्नई सुपर किंग्ससाठी वाट कठीण…
या संघाचे 12 सामन्यात 12 पाँईट आहेत. चेन्नई आता जास्तीत-जास्त 16 गुणांपर्यंत पोहोचू शकते. त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे, तरीही त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. जर इतर समीकरणे जुळून आली, तर 14 गुणांवरही चेन्नई पात्र ठरू शकते, पण त्यासाठी पंजाब आणि राजस्थानने त्यांचे सर्व सामने हरणे आवश्यक आहे.

कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाताच्या नशिब इतरांच्या निकालावर अवलंबून राहणार आहे. या संघाचे 11 सामन्यात 9 पाँइट आहेत. उर्वरित सामने जिंकल्यास केकेआर जास्तीत-जास्त 15 पाँईटपर्यंत पोहोचू शकते. आरसीबीकडून झालेल्या पराभवामुळे ते आता दुसऱ्यांच्या निकालावर अवलंबून आहेत. त्यांना स्वतःचे सर्व सामने जिंकावे लागतील आणि आशा करावी लागेल की इतर संघ 16 गुणांचा टप्पा पार करणार नाहीत.

दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात कठीण मार्ग
या संघाचे 12 सामन्यात 10 पाँइट आहेत. दिल्लीसाठी समीकरण तसे आव्हानात्मक आहे. उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंका आणि 14 गुणांवर पोहोचून चमत्कार होण्याची वाट पाहा, अशी त्यांची अवस्था आहे. त्यांचा नेट रन रेट (-9.993) सर्वात खराब आहे, जो त्यांच्यासाठी सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो.

follow us