आयपीएल मिनी ऑक्शन; सॅम करन ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

आयपीएल मिनी ऑक्शन; सॅम करन ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

कोची : आयपीएल 2023 चा लिलाव सुरू झाला आहे. या लिलावाची सुरुवात खूपच रंजक झाली आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा मान सॅम करन यानं पटकावला असून तब्बल 18.50 कोटींना पंजाब किंग्सने त्याला विकत घेतलं आहे. तर कॅमरॉन ग्रीन आणि बेन स्टोक्स यांनीही रेकॉर्ड ब्रेक केले आहे. ग्रीनला 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सने तर बेन स्टोक्सला 16.25 कोटींना सीएसकेनं विकत घेतलं आहे. निकोलस पूरनलाही चांगली किंमत यंदाच्या ऑक्शनमध्ये मिळाली असून 16 कोटींना त्याला लखनौ सुपरजायट्ंसने विकत घेतलं आहे.

काही खेळाडूंना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे. यामध्ये 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सने ख्रिस मॉरिसला 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले. 2015 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने युवराज सिंगला 16 कोटींना खरेदी केले होते. दिनेश कार्तिकला आरसीबीने 2019 मध्ये 10.5 कोटी रुपयांना खरेदी केले होते. वरुण चक्रवर्तीला 2020 मध्ये पंजाब किंग्जने 8.4 कोटींना विकत घेतले होते, शिमरॉन हेटमायरला 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने 7.75 कोटींना खरेदी केले होते, 2021 मध्ये झी रिचर्डसनला पंजाब किंग्जने 14 कोटींना खरेदी केले होते.

सॅम करण – 18.50 कोटी, पंजाब किंग्स
कॅमेरुन ग्रीन – 17.50 कोटी, मुंबई इंडियन्स
बेन स्टोक्स – 16.25 कोटी, चेन्नई सुपरकिंग्स
निकोलस पूरन- 16 कोटी, लखनौ सुपरजायंट्स
हॅरी ब्रुक – 13.25 कोटी, सनरायझर्स हैदराबाद
मयांक अगरवाल – 8.25 कोटी, सनरायझर्स हैदराबाद
जोसन होल्डर – 5.75 कोटी, राजस्थान रॉयल्स
केन विल्यमसन – 2 कोटी, गुजरात टायटन्स
अजिंक्य रहाणे – 50 लाख, चेन्नई सुपरकिंग्स

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube