Kane Williamson चा नवा विक्रम, गांगुली व सेहवागला टाकले मागे

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (94)

न्यूझीलंडच्या ( New Zealnad ) संघाचा धडाकेदाज फलंदाज केन विल्यमसन (Kane Williamson ) याने नवा विक्रम केला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली व भारताचा माजी धडाडीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडीत काढला आहे. न्यझीलंडच्या संघाची सध्या इंग्लंडच्या संघाविरुद्ध कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत त्याने हा विक्रम केला आहे.

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडचा दुसरा कसोटी सामना इंग्लंडच्या बेसिन रिजर्व येथे खेळवला जात आहे. इंग्लंडच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये 435 धावा केल्या होत्या. त्याच्या उत्तरात 209 धावांवर न्यूझीलंडचा संघ गारद झाला. यानंतर इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला. त्यानंतर केन विल्यमसनने शानदार शतक झळकावले.

या शतकासह त्याने न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलरचा देखील विक्रम मोडला आहे. या शतकासह केन विल्यमसन हा न्यूझीलंडच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू झाला आहे.
विल्यमसनने 226 बॉल्समध्ये 8 चौके मारुन आपले शतक पूर्ण केले. या शतकासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 39 शतक झाले आहेत. यासह त्याने सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग व एलेस्टर कुक यांना मागे टाकले आहे.

(अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळल्या)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube