महिला वर्ल्ड कप विजेता संघाचे राज्य सरकारकडून अभिनंदन, खेळाडूंचा होणार सत्कार; CM फडणवीसांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis On Indian Women's Cricket Team : मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानावर झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या
Devendra Fadnavis On Indian Women’s Cricket Team : मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानावर झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषकावर भारताचे नाव कोरले. तर आता या संघात असणाऱ्या राज्यातील महिला खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मोठी घोषणा करत राज्यातील महिला खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
तर यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील आयसीसी महिला विश्वचषकावर (ICC Women’s Cricket World Cup) पहिल्यांदाच भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन करण्यात आले होते. याबाबतच्या अभिनंदन प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय संघाच्या या घवघवीत यशाबाबत गौरवोद्गार काढले.
भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मानधाना (Smriti Mandhana) , जेमिमा रॉड्रीग्ज (Jemimah Rodrigues) , आणि राधा यादव (Radha Yadav) यांना या ऐतिहासिक विजयातील भागीदारीसाठी रोख पारितोषिकाने गौरवान्वित करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत मंजुर करण्यात आला असल्याची माहिती देखील माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीत महिला वर्ल्ड कप विजेता भारतीय संघाचा राज्य सरकारकडून अभिनंदन करण्यात आले. याबाबतच्या अभिनंदन प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच या संघात असणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मानधाना, जेमिमा रॉड्रीग्ज, आणि राधा यादव यांना रोख पारितोषिकाने गौरवान्वित येणार आहे.
पवनचक्की उभारणी तील ‘मध्यस्थां’ चा सुळसुळाट बंद करा मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश
तसेच भविष्यात जेव्हा भारतीय महिला संघ मुंबईत असेल तेव्हा संपूर्ण संघाचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती देखील माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
