Mitchell Starc : मिचेल स्टार्क IPL 2027 मधून आऊट ? दिल्ली कॅपिटल्सच्या चिंतेत वाढ

Mitchell Starc : आयपीएल 2027 साठी दिल्ली कॅपिटल्सकडून जोरदार तयारी सुरु आहे. नुकतंच संघाने सौरव गांगुलीला मुख्य प्रशिक्षक म्हणून संघात

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Mitchell Starc

Mitchell Starc : आयपीएल 2027 साठी दिल्ली कॅपिटल्सकडून जोरदार तयारी सुरु आहे. नुकतंच संघाने सौरव गांगुलीला मुख्य प्रशिक्षक म्हणून संघात दाखल केला आहे. तर दुसरीकडे आता दिल्ली कॅपिटल्सच्या चिंतेत भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनने आयपीएल 2027 बाबत मोठं वक्तव्य केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. गेल्या हंगामात फक्त सहा सामने खेळू शकणारा स्टार्क आयपीएल 2027 मध्ये खेळताना दिसणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आगामी वेळापत्रक अत्यंत व्यस्त असल्याने, आयपीएलमध्ये स्टार्कचा सहभाग अनिश्चित असल्याचे दिसत आहे. जरी अद्याप काहीही निश्चित झालेले नसले, तरी स्टार्क (Mitchell Starc) आणि ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक यांनी केलेल्या विधानांमुळे दिल्ली फ्रँचायझीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील वर्षीच्या आयपीएलचे (IPL 2027) वेळापत्रक ऑस्ट्रेलियाच्या व्यस्त क्रिकेट कॅलेंडरशी टकराण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये इंग्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक 150 व्या वर्धापन दिन कसोटी सामन्याचाही देखील समावेश आहे. स्टार्कने म्हटले आहे की, मी आयपीएलबाबत काही चर्चा केल्या आहेत, परंतु अद्याप काहीही अंतिम झालेले नाही.

तर दुसरीकडे आयपीएल ही खेळाडूंच्या विकासासाठी महत्त्वाची टी20 स्पर्धा असल्याचे मान्य करत, मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) यांनी ‘क्रिकइन्फो’ (Cricinfo) ला सांगितले, मला माहीत आहे की, लोक आयपीएलबद्दल (Delhi Capitals) चर्चा करतील. आमच्या अनेक खेळाडूंसाठी हे त्यांच्या व्यवस्थापन योजनेचा एक भाग आहे. आमच्या सर्वोत्तम खेळाडूंना या प्रमुख लीगमध्ये खेळू देणे फायदेशीर ठरते.

विद्युत जामवालने दिलेला शब्द पाळला; रोमन रेंसचा भारतीय चाहत्यांसाठी खास संदेश-

देश आणि फ्रँचायझी यांच्यातील चर्चेत, आमच्या वेगवान गोलंदाजांना त्यांच्या शरीराला पुन्हा सावरण्याची आणि योग्य फिटनेस राखण्याची संधी देणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ते भविष्यातील संधींसाठी सज्ज राहू शकतील.

follow us