ODI WC 2023 : वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच दिसणार सर्व संघाचे नवे कर्णधार

ODI WC 2023 : वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच दिसणार सर्व संघाचे नवे कर्णधार

ODI WC 2023 :  T20 विश्वचषक 2022 मधील दारुण पराभवानंतर, टीम इंडियाला यावर्षी एकदिवसीय विश्वचषक 2023 चे आयोजन भारतातच करायचे आहे. यावेळी भारतात खेळला जाणारा एकदिवसीय विश्वचषक पूर्णपणे नवीन शैलीत दिसणार आहे. यावेळी सर्व संघांचे कर्णधार नवे दिसणार आहेत. गेल्या वेळी 2019 च्या विश्वचषकात ज्या खेळाडूंना संघाची कमान देण्यात आली होती, ते यावेळी कर्णधार म्हणून दिसणार नाहीत.

यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद रोहीत शर्मा सांभाळणार आहे. गेल्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार होता. तसेच यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन हा दुखापतीमुळे वर्ल्डकप खेळू शकणार नाही. यावेळी असे अनेक संघ आहेत की ज्यांचे कर्णधार हे पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहेत.

केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक : राहुल गांधी प्रकरणावरुन मांडणार… 

ईएसपीएनक्रिकइन्फाच्या रिपोर्ट अनुसार, 2023च्या वनडे वर्ल्डकपमध्ये मागच्या वर्ल्डकपमध्ये ज्या खेळाडूंनी कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती ते खेळाडू यावर्षीच्या वर्ल्डकपमध्ये कर्णधार म्हणून दिसणार नाही. यावेळी केन विलियमसन हा एकमात्र असा कर्णधार होता की जो यंदाच्या वर्ल्डकपमध्ये देखील कर्णधार पद सांभाळणार होता. पण आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये तो दुखापतग्रस्त झाल्याने तो वर्ल्डकप खेळताना दिसणार नाही.

https://letsupp.com/maharashtra/western-maharashtra/and-the-leader-of-ncp-filled-ajit-pawar-33204.html

केन विलियमसन याने 2019च्या वर्ल्डकपमध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा अवार्ड जिंकला होता. त्याने संपूर्ण टूर्नामेंटमध्ये 578 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडची क्रिकेट टीम केन विलियमसनच्याऐवजी टॉल लॅथमला टीमचे कर्णधारपद सोपवू शकते. त्याने याआधी देखील विलियमसनच्या अनुपस्थितीमध्ये कॅप्टन्सी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube