Pahalgam Terrorist Attack : मेंदूचा वापर करा, शाहिद आफ्रिदीला गब्बरने दिले चोख प्रत्युत्तर

Pahalgam Terrorist Attack : मेंदूचा वापर करा, शाहिद आफ्रिदीला गब्बरने दिले चोख प्रत्युत्तर

Shikhar Dhawan On Shahid Afridi : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack ) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत कधीही हल्ला करु शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. त्यामुळे अनेकजण भारतीय सैन्याविरोधात वादग्रस्त विधान करताना दिसत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने देखील भारतीय सैन्यविरोधात वादग्रस्त विधान केल्याने आफ्रिदीवर चारही बाजूने टीका होत आहे. तर आता भारतीय क्रिकेटचा ‘गब्बर’ शिखर धवनने (Shikhar Dhawan) शाहिद आफ्रिदीला प्रत्युत्तर दिले आहे. आणखी किती खालची पातळी गाठणार? असा प्रश्न विचारात पाकिस्तान आणि शाहिद आफ्रिदीला भविष्यात यश मिळवण्यासाठी मेंदूचा वापर करावा असा सल्ला देखील शिखर धवनने दिला आहे.

‘एक्स’ वर  भारताचा माजी खेळाडू शिखर धवन म्हणाला की,  आम्ही तुम्हाला कारगिलमध्येही हरवले आहे, तुम्ही आता आणखी किती खालची पातळी गाठणार? शाहिद आफ्रिदीने भारताबद्दल बोलण्यापेक्षा पाकिस्तानाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत करावा. आम्हाला भारतीय सैन्यावर अभिमान आहे. भारत माता की जय, जय हिंद. असं प्रत्युत्तर शिखर धवनने शाहिद आफ्रिदीला दिला आहे.

तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी भारतीय सैन्याला जबाबदार धरले होते. काश्मीरमध्ये भारताचे 8 लाख सैन्य आहे आणि तरही देखील हल्ला झाला. याचा अर्थ तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही. असं आफ्रिदी म्हणाला होता.

पुढे बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय मीडिया बॉलिवूड झाला आहे. कृपया तुमच्या फायद्यासाठी सगळं बॉलिवूड बनवू नका असं म्हणत त्याने भारतीय सैन्यासाठी ‘नालायक’ आणि ‘निकम्मे’ अशा शब्दांचाही वापर केला होता. यानंतर त्याच्यावर चारही बाजूने टीका होत आहे.

होणार धमाल, ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टीझर भेटीला

तर दुसरीकडे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्लात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश होता. या हल्ल्यानंतर भारत सरकारने भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहे. तसेच भारताने सिंधू जल करार देखील रद्द करण्याची घोषणा केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube