मोठी बातमी! पाकिस्तानचा टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार
पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला टी २० वर्ल्ड कपबाबतचा निर्णय घ्यायचा होता. मोहसिन नक्वी यांनी हे प्रकरण पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे नेले होते.
पाकिस्तानच्या सरकारने टी २० वर्ल्ड कपबाबतआता मोठा निर्णय घेतला आहे. (Sports) पाकिस्तानच्या सरकारने आपल्या संघाला टी २० वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाछी परवानदी दिली आहे. पण भारताविरुद्धच्या सामन्यावर मात्र पाकिस्तानने बहिष्कार टाकला आहे. पण हा बहिष्कार टाकत असताना पाकिस्तानच्या सरकारने नेमकं काय म्हटलं आहे, हे आता समोर आलं आहे.
पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला टी २० वर्ल्ड कपबाबतचा निर्णय घ्यायचा होता. मोहसिन नक्वी यांनी हे प्रकरण पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे नेले होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले होते. मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानच्या पतप्रधानांना तीन पर्याय दिले होते, यामधील पहिला संपूर्ण टी २० वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याचा होता. त्यानंतर दुसरा पर्याय हा फक्त भारताच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा होता. यामध्ये तिसरा पर्याय हा सामना खेळून भारताविरुद्ध काळी पट्टी बांधण्याचा होता. पाकिस्तानच्या सरकारने आता यामधील दुसरा पर्याय निवडला आहे.
Pak Vs SL T20 : बाबर आझम, शाहीन आफ्रिदीसह या 4 स्टार खेळाडू पाकिस्तान संघातून बाहेर
आता पाकिस्तान टी २० वर्ल्ड कप तर खेळणार आहे, पण ते भारताविरुद्धचा सामना खेळणार नाहीत. पण भारताविरुद्धच्या सामन्याबाबत हा निर्णय घेताना पाकिस्तानच्या सरकारने नेमकं काय म्हटलं आहे, हे आता समोर आले आहे. पाकिस्तानच्या सरकारने टी २० वर्ल्ड कपबाबत एक प्रसिध्दी पत्रक काढले आहे. ” पाकिस्तान क्रिकेट संघाला ट्वेंटी-२० विश्वचषकात सहभागी होण्यास मंजुरी दिली आहे, तथापि, १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध नियोजित सामन्यात पाकिस्तान संघ मैदानात उतरणार नाही,” असे पाकिस्तान सरकारच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पाकिस्तानच्या सरकारने असा निर्णय घेऊन आता आयसीसी आणि जय शहा यांना कोंडीत पकडण्याचा प्लॅन केला आहे. कारण वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान सामना सर्वात जास्त पाहिला जातो. त्यामुळे पाकिस्तानच्या सरकारने हा निर्णय घेऊन आयसीसीला वठीणवर आणण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानने तर आता आपला निर्णय घेतला, पण आता आयसीसीच्या कोर्टात हा चेंडू पडला आहे. त्यामुळे आता आयसीसी यावर नेमका काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
