मोठी बातमी! पुरूष संघाकडून सलग तिसऱ्यांदा लोळवल्यांतर महिला संघाकडूनही पाकिस्तानचा पराभव

भारताने वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा सलग 12 वा पराभव केला आहे. आतापर्यंत पाकिस्तानला एकही सामना भारताविरुद्ध जिंकता आलेला नाही.

Sport

टी 20 आशिया कपमध्ये नुकताच भारतीय पुरूष संघाने पाकिस्तानचा पराभव केला. (Pakistan) त्यानंतर आज महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला आहे. भारताने विजयासाठी 247 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानचा डाव फक्त 159 धावांवर आटोपला. भारताने हा सामना 88 धावांनी जिंकला आणि गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. भारताने वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा सलग 12 वा पराभव केला आहे. आतापर्यंत पाकिस्तानला एकही सामना भारताविरुद्ध जिंकता आलेला नाही.

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला आहे. भारताने विजयासाठी 247 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानचा डाव फक्त 159 धावांवर आटोपला. भारताने हा सामना 88 धावांनी जिंकला आणि गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताने वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा सलग 12 वा पराभव केला आहे. आतापर्यंत पाकिस्तानला एकही सामना भारताविरुद्ध जिंकता आलेला नाही. भारताने सुरुवातीच्या दोन सामन्यात विजय मिळवत 4 गुण आणि +1.505 नेट रनरेटसह पहिलं स्थान गाठलं.

रोहित शर्माचे कर्णधारपद गेले; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शुभमन गिलवर जबाबदारी

247 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. मनीबा अली रन आऊट झाली. सदफ शमास 6 धावा करुन बाद झाली. क्रांति गौड हिनं 3 विकेट घेतल्या. आळिया रियाझ 2 धावा करुन बाद झाली. नतालिया परवेझनं 46 धावा केल्या. कॅप्टन फातिमा सना केवळ 2 धावा करु शकली. सिदरा नवाज हिनं 14 धावा केल्या सिद्रा अमीन हिनं 81धावांची खेळी केली.

भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली होती. प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. स्मृती मानधना 23 धावा करुन बाद झाली. प्रतिका रावलनं 31 धावा केल्या. हरमनप्रीत कौर 19 धावा करु शकली. हरलीन देओलनं 46 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जनं 32 तर स्नेह राणानं 20 धावा केल्या. रिचा घोषनं 35 धावा केल्या.भारताकडून क्रांती गौडनं 3 विकेट घेतल्या. दिप्ती शर्मानं 3 आणि स्नेह राणानं 2 विकेट घेतल्या.

follow us