भारत व श्रीलंकेतील अंतिम सामना उद्या रंगणार

भारत व श्रीलंकेतील अंतिम सामना उद्या रंगणार

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवारी तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. मेन इन ब्लूने याआधीच मालिका 2-0 ने जिंकली आहे. आता श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत भारतीय संघ असणार आहे.

भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 4 गडी राखून विजय मिळवला. तिसरा आणि शेवटचा वनडे तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाईल. यासाठी दोन्ही संघ केरळला पोहोचले आहेत.

भारतासाठी पहिल्या सामन्यात कोहलीने शतक झळकावले. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात उमरान आणि कुलदीप यादव यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. दरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यात 164 सामने खेळले गेले आहेत.

भारताने 95 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत आहे. तर 11 सामन्यांचा निकाल लागला नाही. भारताला त्यांच्या तालिकेत आणखी एक विजय मिळवायचा आहे.

सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही सदस्यांनी श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांनी देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिराला भेट दिली.

सामना कधी खेळवला जाणार : रविवार, 15 जानेवारी
वेळ : दुपारी 01.30 वाजता
ठिकाण : ग्रीनफिल्ड स्टेडियम, तिरुअनंतपुरम
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मो. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube