संजू सॅमसनचा आयपीएलमध्ये मोठा विक्रम; या दिग्गजांना टाकले मागे !

Sanju Samson-सॅमसनने सर्वात वेगाने या धावा केल्या आहेत. तो सर्वात वेगवान 5 हजार आयपीएल धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज बनला आहे.

  • Written By: Published:
Sanju Samson

Sanju Samson 5000 IPL Runs Record: चेन्नई सुपर किंग्सचा स्फोटक ओपनर संजू सॅमसन (Sanju Samson) जोरदार खेळत आहे. आयपीएलच्या ( IPL)यंदाच्या सत्रात संजू सॅमसनने दोन शानदार शतके झळकविले आहेत. परंतु आजच्या गुजरात टायटन्सविरुद्ध सामन्यात तो लवकर बाद झाला असला तरी त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदविला गेला आहे. आजच्या सामन्यात पहिला चौकार मारत या लीगमध्ये पाच हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम त्याने केला आहे. या लीगच्या इतिहासात पाच हजार धावा करणारा सॅमसन हा दहावा फलंदाज ठरला आहे. ही कामगिरी करताना त्याने केएल राहुल आणि एमएसधोनी सारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे.


दोनदा डीए़डची परीक्षा फेल मग थेट पश्चिम बंगाल गाठले; मनोहर भोसलेची सूरस कथा


धोनी, रैना आणि राहुलला टाकले मागे

सॅमसनने सर्वात वेगाने या धावा केल्या आहेत. तो सर्वात वेगवान 5 हजार आयपीएल धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने 3555 चेंडूमध्ये हा पराक्रम केला आहे. त्याने सुरेश रैनाचा विक्रम मोडला आहे. रैनाने 3620 चेंडूंमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर एमएस धोनी (3691 चेंडू) आणि केएल राहुलला (3688 चेंडू) मागे टाकले आहे.


‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर’मध्ये गोळीबार करणाऱ्याची ओळख समोर, कोण आहे 31 वर्षाचा तरुण?


सर्वात वेगवान धावा करण्यात सॅमसन तिसऱ्यास्थानी

एबी डिव्हिलियर्सने पाच हजार धावा 3288 चेंडूत पूर्ण केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरने 3554 चेंडूत पाच हजार धावांचा टप्पा पूर्ण केलाय. तर संजू सॅमसनने 3555 चेंडूत हा टप्पा ओलांडला आहे. या लीगमध्ये 5000 धावा कणाऱ्या संजू हा आठवा भारतीय फलंदाज आहे. तर कमी डावांत 5 हजार धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत सॅमसन सातव्या स्थानावर आहे. त्याने आपल्या 181 व्या डावात हा टप्पा गाठला. या बाबतीत त्याने एमएस धोनी, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांना मागे टाकले आहे. या यादीत डेव्हिड वॉर्नर (135 डाव) पहिल्या क्रमांकावर आहे, तर विराट कोहली (157), एबी डिव्हिलियर्स (161), शिखर धवन (168) आणि सुरेश रैना हे सॅमसनच्या पुढे आहेत.

follow us