मयंक यादव-श्रेयंका पाटील रिलेशनमध्ये आहेत का?, एकत्र पाहाताच सोशल मीडियावर जोरदार चर्चा

  • Written By: Published:
मयंक यादव-श्रेयंका पाटील रिलेशनमध्ये आहेत का?, एकत्र पाहाताच सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Shreyanka Patil and Mayank Yadav : मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यादरम्यान काल बंगळूरू येथे सामना झाला. अतितटीच्या सामन्यात मुंबईने बंगळूरूचा ४ विकेट्सने पराभव केला. (Mayank Yadav) काल हरमनप्रीत कौरला आरसीबीच्या फॅन्सनी डीवचले अन् हरमनप्रीतने सामना जिंकत आरसीबीच्या चहत्यांना घरच्या मैदानावर शांत केले. पण काल हरमनप्रीत सोबतच मैदानाबाहेर आणखी एक खेळाडू चर्तेत आली. ती म्हणजे आरसीबीची क्रिकेटपटू श्रेयंका पाटील.

श्रेयंका पाटील सध्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. महिला प्रिमिअर लीगच्या तोंडावर श्रेयंकाला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. स्पर्धा सुरू झाल्यानंतर पहिल्या सामन्यावेळी सोशल मीडियावर निराशेची एक क्रिप्टिक पोस्टही शेअर केली होती. रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूने तिची बदली खेळाडू म्हणून स्नेह राणा हिला संघाशी करारबद्ध केले आहे. राणाला ३० लाखांच्या किंमतीत बंगळुरूने संघात घेतले आहे.

IND vs PAK : भारत–पाकिस्तान महामुकाबला कधी रंगणार? या ठिकाणी फ्रीमध्ये पाहता येणार

श्रेया जरी मैदानाबाहेर असली तरी आरसीबी संघासोबत पहायला मिळत आहे. काल सामन्यापूर्वी देखील ती संघातील सहकाऱ्यांसोबत पाहायला मिळाली. त्यानंतर ती सामन्यावेळी स्टॅंड्समधून आपल्या संघाला चीअर करताना पाहायला मिळाली. यावेळी तिच्या सोबत कर्णधार स्मृती माधनाचा बॉयफ्रेंड आणि क्रिकेटपटू आशा सोभना देखील उपस्थित होती. त्याचबरोबर श्रेयंका पाटीलच्या बाजूला आणखी एक जण होता, ज्यासोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो होता भारतीय क्रिकेटपटू मयंक यादव. मयंक व श्रेयंकाला एकत्र पाहून नेटकऱ्यांनी दोघांच्या रिलेशनच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू केल्या आहेत.

भारताचा वेगवान गोलंदाज मयंक यादव इंडियन प्रिमिअर लीगमध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळतो. त्याला एलएसजीने आयपीएल २०२५ हंगामासाठी ११ कोटी रूपयांत संघात कायम ठेवले. तर श्रेयंका पाटीलाल आरसीबीने या WPL हंगामासाठी संघात कायम ठेवले होते. तिने २०२४ वूमन्स प्रीमियर लीगमध्ये ८ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या होत्या. ती पर्पल कॅपची मानकरीही ठरली होती. तिने बंगळुरूला वूमन्स प्रीमियर लीग जिंकून देण्यातही मोलाचा वाटा उचलला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या