ICC Rankings : सूर्यकुमारला चॅलेंज नाही, T20 यादीत पुन्हा अव्वल; यशस्वीनेही घेतली मोठी झेप

ICC Rankings : सूर्यकुमारला चॅलेंज नाही, T20 यादीत पुन्हा अव्वल; यशस्वीनेही घेतली मोठी झेप

ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी टी 20 क्रिकेटमधील खेळाडूंची (ICC Rankings) ताजी क्रमवारी जाहीर केली. या यादीत अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खान याचाही (Rashid Khan) समावेश आहे. पाठीच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर राशिद खान पुन्हा मैदानात परतला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत तो नवव्या क्रमांकावर आहे. राशिद खानने आयर्लेंडविरुद्धच्या टी 20 मालिकेतील तीन सामन्यांत 8 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने टॉप 10 खेळाडूंच्या यादीत जागा मिळवली.

टी 20 मधील फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाचा धडाकेबाज (Team India) फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या (Surya Kumar Yadav) क्रमांकावर कायम आहे. तर इंग्लंड संघाचा फिल सॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीत कोणताही बदल झालेला नाही. सूर्यकु्मार व्यतिरिक्त या यादत भारताचा आणखी एक खेळाडू यशस्वी जैस्वालही (Yashasvi Jaiswal) आहे. यशस्वी जैस्वाल सहाव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा नवीन उल हक 55 व्या क्रमांकावर आहे. जोशुआ लिटल (39) आणि मार्क एडर 56 व्या क्रमांकावर आहे. बॅरी मॅकार्थीने 15 स्थानांची झेप घेत 77 वा क्रमांक मिळवला आहे.

Team India : वर्ल्ड टेस्ट स्पर्धेच्या फायनलमध्ये कोण? ‘या’दोन संघांशी टीम इंडियाची टक्कर

गोलंदाजीत राशिदची चमकदार कामगिरी

राशिद खानने आयर्लेंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. या मालिकेत त्याने एकूण 8 विकेट घेतल्या. या यादीत तो नवव्या क्रमांकावर आहे. त्याच्याआधी न्यूझीलँडचा गोलंदाज मिचेल सँटनर आठव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा अक्षर पटेल चौथ्या तर रवी बिश्नोई पाचव्या क्रमांकवर आहे. अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई व्यतिरिक्त टॉप 20 यादीत अन्य भारतीय खेळाडू नाहीत.

रोहित शर्माचा चौथा नंबर 

एकदिवसीय क्रिकेटच्या बाबतीत (One Day Cricket) काही बदल झाले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चौथ्या क्रमांकावर आहे. तर श्रीलंकेचा पाथुम निसांकाने (Pathum Nisanka) तिसऱ्या स्थानांनी झेप घेत आठवा क्रमांक मिळवला आहे. या यादीत आणखी काही महत्वाचे बदल झालेले नाहीत.

Team India : जिंकल्याचा फायदा नाहीच! टीम इंडियाचा दुसरा नंबर कायम; नेमकं काय घडलं?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube