हीथ स्ट्रीक जिवंतच! मृत्यूची बातमी देणाऱ्या मित्रालाच पाठवला मेसेज

हीथ स्ट्रीक जिवंतच! मृत्यूची बातमी देणाऱ्या मित्रालाच पाठवला मेसेज

Heath Streak : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकचे निधन झाल्याच्या बातम्या धादांत खोट्या असल्याचे काही वेळातच सिद्ध झाले आहे. झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हेनरी ओलंगा यानेच ट्विट करत स्ट्रीकच्या निधनाची बातमी दिली होती. त्यांतर काही वेळातच त्याने दुसरे ट्विट करत स्ट्रीक जिवंत असल्याची माहिती दिली आहे. याचे कारण म्हणजे स्ट्रीकने त्याला मेसेज पाठवत आपण जिवंत असल्याचे सांगितले.

झिम्बाब्वेचा माजी गोलंदाज हेनरी ओलंगाने हीथ स्ट्रीकच्या निधनाची माहिती त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. दुःखद बातमी दिली होती. हीथ स्ट्रीक  आता दुसऱ्या जगात निघून गेल्याचे म्हटले होते. या वृत्ताने सगळ्याच क्रिकेटविश्वाला धक्का बसला होता. या ट्विटच्या आधारे जगभरातील सर्वच प्रसारमाध्यमांनी स्ट्रीकच्या मृत्यूच्या बातम्या दिल्या होत्या. यानंतर मात्र ओलंगाने एक चॅटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यामध्ये त्याने हीथ स्ट्रीक जिवंत असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/henryolonga/status/1694212344732357101?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1694212344732357101%7Ctwgr%5E5e6fcc767245abe59f2949d4083b761f06ce6b74%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fkrida%2Fzimbabwe-cricket-legend-heath-streak-dies-at-49-sgk-96-3868868%2F

ओलंगाने ट्विटमध्ये म्हटले आहे, की मी खात्री करू इच्छितो की मी हीथ स्ट्रीकशी आताच बोललो आहे. तिसऱ्या पंचाने त्याला परत बोलावले. तो पूर्णपणे जिवंत आहे आणि त्यासोबतच खाली त्याच्या मेसेजचा स्क्रिन शॉट देखील शेअर केला आहे.

स्ट्रीकने सन 2000 ते 2004 दरम्यान झिम्बोब्वेच्या संघाचे नेतृत्व केले. 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 65 कसोटी सामने आणि 189 एकदिवसीय स्ट्रीक खेळला होता. या सामन्यात असेही काही सामने होते ज्यामध्ये हीथ स्ट्रीकने जोरदार गोलंदाजी आणि वेळप्रसंगी फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला जेरीस आणले होते. झिम्बाब्वेचा तो एकमेव असा खेळाडू होता ज्याने 100 विकेट्स घेतल्या आहेत.

 असा घ्यावा लागला क्रिकेटमधून संन्यास

हीथ स्ट्रीकच्या कारकिर्दीची सुरुवात 1993 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात झाली होती. रावळपिंडी येथे हा सामना खेळवण्यात आला होता. या पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी करत स्ट्रीकने 8 विकेट घेतल्या. 2005 मध्ये स्ट्रीकला संन्यास घ्यावा लागला. कारण, वारविकशायरच्या कॅप्टनच्या रुपात त्याचा दोन वर्षांचा करार 2006 मध्ये संपणार होता. मात्र, खराब कामगिरीमुळे त्याला आधीच संन्यास घ्यावा लागला. 2007 मध्ये स्ट्रीक आयपीएलमध्ये होता, येथेच त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला.

निवृत्तीनंतर स्ट्रीकनं पुढं काय केलं ?

क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर स्ट्रीकने कोचिंगची जबाबदारी स्वीकारली. झिम्बाब्वे, स्कॉटलँड, बांग्लादेश, गुजरात लायन्स, कोलकाता नाइट रायडरस या संघांसोबत काम केले. आयसीसीने भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत स्ट्रीकवर आठ वर्षांचा प्रतिबंध लावला. यानंतरही स्ट्रीकची क्रिकेटर आणि कप्तानाच्या रुपातील कामगिरी वाखाणण्यासारखीच राहिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube