केएल-अक्षरची निर्णायक खेळी, भारताच्या 136 धावा, मात्र ऑस्ट्रेलियाला 131 रन्सचं टार्गेट

आता टीम इंडियाचे गोलंदाज ऑस्ट्रेलियाला हे आव्हान पूर्ण करण्यापासून रोखणार की यजमान शुबमनसेनेला पराभूत करत विजयी सलामी देणार?

  • Written By: Published:
News Photo (6)

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थमधील पहिला एकदिवसीय सामना हा पावसाच्या व्यत्ययामुळे 26 षटकांचा करण्यात आला. टीम इंडियाने या 26 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 136 रन्स केल्या. मात्र, त्यानंतरही ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाच्या तुलनेत 5 पेक्षा कमी धावांचं आव्हान मिळालं आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी डीएलएसनुसार 131 धावांचं आव्हान मिळालं आहे. आता टीम इंडियाचे गोलंदाज ऑस्ट्रेलियाला हे आव्हान पूर्ण करण्यापासून रोखणार की यजमान शुबमनसेनेला पराभूत करत विजयी सलामी देणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

 

Tags

follow us