World Cup 2023 : पाकिस्तानला धूळ चारली अन् भारताची गुणतालिकेत मोठी झेप !
IND vs PAK : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या लढतीत भारताने (India ) पाकिस्तानवर (Pakistan) सात विकेट राखून दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयाबरोबर भारताने वर्ल्डकपमध्ये आठव्यांदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. या विजयासह गुणतालिकेतही (Point Table) भारताने मोठी झेप घेतली आहे. गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना दुहेरी आनंद झाला आहे.
रोहित शर्माने षटकारांचा इतिहास रचला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकारांचा मानकरी
भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीला आमंत्रित केले होते. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय गोलंदाजांनी यशस्वी ठरविला. भारताचा सर्वच गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. पाकिस्तान संघ 191 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात 192 धावांचे लक्ष्य भारताने 30. 3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठले. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावांची मोठी खेळी केली आहे. तर श्रेयस अय्यरने नाबाद 53 धावा करत भारताला विजय मिळवून दिला आहे.
या विजयाबरोबर गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर आला आहे. त्यापूर्वी भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर होता. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान या संघाला पराभूत केले आहे. भारताने आतापर्यंत झालेले तिन्ही सामने मोठा फरकाने जिंकली आहेत. त्यामुळे भारताचे सहा गुण झाले आहेत. भारताचा रनरेट (1.821) चांगला आहे. मागील उपविजेता न्यूझीलंड संघाने सलग तीन सामने जिंकले आहेत. हा संघ सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
World Cup 2023 : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, रोहित शर्मा, श्रेयस अय्यरची धुव्वाधार खेळी
दक्षिण आफ्रिका संघ दोन सामने खेळला असून, या संघाने दोन्ही सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे चार गुणांसह हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान संघ तीन सामने खेळला असून, त्यात दोन विजय मिळविला आहेत. तिसऱ्या सामन्यात भारताकडून हा संघ पराभूत झाला आहे. त्यामुळे दोन विजय मिळवलेला पाकिस्तान संघ चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा संघाचे रनरेट (-0.137) मध्ये पिछाडीवर आहे. हे पाक संघासाठी धोक्याचे आहे.
गतविजेता इंग्लंड पाचव्या स्थानावर
गतविजेता इंग्लंड संघ दोन सामने खेळला आहे. त्यात एक विजय व एक पराभव आहे. त्यामुळे दोन गुणांसह इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे. तर बांग्लादेश दोन गुणांसह सहाव्या, श्रीलंका सातव्या क्रमांकावर आहे. लंका दोन्ही सामन्यात पराभूत झाला आहे. त्यामुळे या संघाचे शून्य गुण आहेत. त्या खालोखाल नेदरलँडस्, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान हे संघ आहेत.