बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लोकांनीच कठोर भूमिका घेतली तर लोकांना दोष देऊ नये, अशी प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेचे संभाजी महाराज छत्रपती यांनी बदलापूर घटनेवर दिलीयं. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीयं.
आंदोलक बदलापुरचे नाहीत, ही राजकीय स्टंटबाजीच, असल्याचा दावा भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केला आहे.
पोलिसांची भूमिका पाहून डोकं सणकतंय, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. यासंदर्भात आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीयं.
संवेदना बोथट झालेले विरोधक असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर केलीयं.