शिवरायांच्या पुतळ्यावरुन राजकारण म्हणजे खुजेपणाच, असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कडक शब्दांत सुनावलंय. ते मुंबईत बोलत होते.
हा पुतळा कल्याण येथील जयदीप आपटे यांनी बनविलेला आहे. त्यांनी आपल्या जीवनात पहिल्यांदाच एवढा मोठा पुतळा बनविला असल्याचे सांगितले होते.
जोरदार वाऱ्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, ते दुर्देवी आहे. आमचे मंत्री परिस्थितीची पाहणी करीत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीयं.
घाई गडबडीत उभारलेला शिवरायांचा पुतळा कोसळला असल्याची खंत संभाजी महाराज छत्रपती यांनी व्यक्त केलीयं. यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केलीयं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं समोर आलंय. नौदलानिमित्त मोदींनी पुतळ्याचं अनावरण केलं होतं.