घाई गडबडीत उभारलेला शिवरायांचा पुतळा कोसळला; संभाजी महाराज छत्रपतींनी व्यक्त केली खंत

घाई गडबडीत उभारलेला शिवरायांचा पुतळा कोसळला; संभाजी महाराज छत्रपतींनी व्यक्त केली खंत

Sambhaji Maharaj Chatrapati : सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवणस्थित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Sambhaji Maharaj Chatrapati) कोसळल्याचं समोर आलंय. पुतळा कोसळण्यावरुन विरोधकांकडून भाजपला टार्गेट केलं जात आहे. आधी काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता संभाजी महाराज छत्रपती यांनी खंत व्यक्त केलीयं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत शिवरायांचा पुतळा उभारला, पण पुतळा कोसळलायं, आता शिवरायांचं उचित स्मारक उभारणे गरजेचं असल्याचं संभाजी महाराज छत्रपती यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केलीयं.

संभाजी महाराज शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले,”पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला ! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार ! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे,” अशी मागणी संभाजी महाराजांनी केलीयं.

Sindhudurga : छ. शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला; PM मोदींच्या हस्ते वर्षभरापूर्वीच झालेले अनावरण

संभाजी महाराजांआधी आमदार वैभव नाईक यांनी शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरुन निकृष्ट दर्जाचं काम सुरु होतं असा गंभीर आरोप केलायं. स्थानिकांच्या माहितीनूसार पुतळ्याच्या कामासंदर्भात वेळोवेळी तक्रार करुनही तक्रारीकडे दुर्लक्ष केलं गेलं असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता विरोधकांकडूनही पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही भाजपला टार्गेट केलंय.

“पंतप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला.. राजांचा पुतळा नव्हे, महाराष्ट्रधर्म पडला..!! आपल्या प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नीतीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेलाचं फटका…!! नौदल दिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला..!!” असल्याची टीका शरद पवार गटाकडून करण्यात आलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube