- Home »
- Lok Sabha
Lok Sabha
विक्रम काळे, बसवराज पाटील अन् परदेशी नक्कीच नाहीत… घरातूनच मिळणार निंबाळकरांना टफ फाईट
धाराशिवची जागा कोणाकडे जाणार? कोण लढणार? ओमराजेंसारख्या (Omraje Nimbalkar) तगड्या उमेदवाराला, ठाकरेंच्या या वाघाला कोण भिडणार? अशा प्रश्नांची उत्तरे अखेरीस मिळाली आहेत. अनेक दिग्गजांचे आणि बड्या राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत राष्ट्रवादीकडून एका नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील (Archana Patil) या आता […]
महाविकास आघाडीला ‘वंचित’चा एवढा धसका का? इतिहास पहाच!
सिंहासन चित्रपटातील एक सिन आहे. मुख्यमंत्र्यांना घालवून विश्वासराव दाभाडे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. त्यासाठी ते फिल्डिंग लावत असतात. याच फिल्डिंगचा एक भाग म्हणून ते कामगार नेते डिकास्टा यांना भेटायला बोलवतात. दोघांची भेट होते, त्यावेळी दोघांमधील एक डायलॉग त्यावेळी प्रचंड गाजला होता. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मी नव्या मुख्यमंत्र्यांना सचिवालयासमोर चपलेने मारेन… कोणतीही […]
ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पाचही विद्यमान खासदारांसह वाघेरे, वाकचौरेंना संधी
मुंबई : भाजपनंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची (Lok Sabha) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करुन एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विद्यमान पाच खासदारांसह माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai), भाऊसाहेब वाकचौरे, अनंत गिते, संजय दिना पाटील, चंद्रकांत खैरे यांना मैदानात […]
सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश, मिळणार मोठी जबाबदारी!
Anuradha Paudwal BJP Party: सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी आज भारतीय जनता पक्षात (BJP ) प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) तारखा जाहीर होण्यापूर्वीच अनुराधन पौडवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीसाठी पक्ष मोठी जबाबदारी देऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. #WATCH | Famous singer Anuradha Paudwal joins the Bharatiya Janata Party […]
सुधीर मुनगंटीवार यांचा गेम कोणी केला…?
अखेरीस नको, नको म्हणत असतानाही भाजपने (BJP) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना जबरदस्तीने लोकसभेच्या घोड्यावर बसवले आहे. आता त्यांना टाच मारुन तो घोडा पळवावाच लागणार आहे. मी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढविण्यासाठी इच्छुक नाही. त्या दृष्टीने मी तयारी देखील केलेली नाही, मला राज्याच्याच राजकारणात रस आहे, ही गोष्ट ते विविध माध्यमातून पक्ष नेतृत्वाला वारंवार […]
देशात 2019 मध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे अन् काठावर निवडून आलेले टॉप 5 खासदार…
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी आणि भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने कंबर कसली आहे. भाजपने स्वबळावर 370 हून अधिक तर एनडीएने 400+ जागा मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर इंडिया आघाडीने मिळून भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला आहे. त्याचवेळी विविध सर्व्हेंमध्ये भाजपला काहीशी अनुकूल आकडेवारी आणि मतदान मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर […]
लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, मग मी…; पंकजा मुडेंनी दिले लोकसभा लढण्याचे संकेत
Pankaja Munde : महायुतीच्या राज्यातील लोकसभेच्या (Lok Sabha) जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आगामी लोकसभेच्या जागावाटपासाठी महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्यात लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार कोण असणार याबाबत कोणताही स्पष्टता नाही. मात्र, त्याआधीच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी लोकसभा उमेदवारीचे संकेत दिलेत. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढं मी तुमची […]
2019 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे टॉप 5 अन् काठावर निवडून आलेले टॉप 5 खासदार…
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही आघाड्यांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) हे प्रमुख पक्ष आहेत. तर महायुतीमध्ये भाजप (BJP), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा समावेश आहे. कादगावर भाजपने (BJP) महायुतीच्या माध्यमातून 45+ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर विविध सर्व्हेंमध्ये […]
कोटक यांच्या खासदारकीला सोमय्यांचा खोडा; दोघांच्या वादात आमदाराला लागणार लोकसभेची लॉटरी?
2019 ची लोकसभा निवडणूक. भाजप-शिवसेना युतीची सत्ता असतानाही दोन्ही पक्षांचे संबंध तुटेपर्यंत ताणले होते. त्यामुळे शिवसेनेने स्वबळाची भाषा सुरु केली होती. पण भाजपला मात्र शिवसेनेची साथ हवीच होती. त्यासाठी भाजपचे (BJP) चाणक्य अमित शाह (Amit Shah) मातोश्रीवर आले आणि त्यांनी तेव्हाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाशी चर्चा केली. बरीच समजूत काढल्यानंतर शिवसेना भाजपशी […]
अभिनयात हिरो पण, राजकारणात झिरो; सनी देओल, शत्रुघ्न सिन्हा लोकसभेत ‘गपगार’
Lok Sabha : चित्रपटात अगदी डॅशिंग भूमिका, तितकेच जबरदस्त डायलॉग, बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटातील अभिनेते ज्यावेळी नेते होतात. खासदारकी मिळवत संसदेत जातात. पण, येथे मात्र तोंडातून चकार शब्दही काढत नाही. एकतर संसदेत हजरच राहत नाहीत आणि राहिले तर एकदम शांतच असतात, असे काही अभिनेते खासदार आहेत ज्यांचं प्रगतीपु्स्तक नुकतच समोर आलं आहे. सतराव्या लोकसभेच्या […]