Maharashtra Elections 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. आता ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत आहे. या मुदतीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. जागावाटप आणि उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र तरीही अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. तर अनेक […]
घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपकडून पराग शाह यांनी अर्ज दाखल केला आहे. शहा राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत चार उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली.
भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये वाशिमचे चार टर्मचे आमदार लखन मलिक यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यात यावी अशी विनंती पक्ष नेतृत्वाला केली आहे.
विद्यमान आमदार लहू कानडे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यांच्या जागी पक्ष संघटनेतील हेमंत ओगले यांना संधी मिळाली आहे.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या (Sujay Vikhe) संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपये इतकी संपत्ती आहे.
काँग्रेस किमान १०० जागांवर लढणार असा सूर पक्षाच्या नेत्यांकडून आळवला जात आहे.