काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी एक फोटो ट्विट करत या फोटोतील पोलिसांव कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अल्पवयीन आरोपी पू्र्णपणे शुद्धीत होता. त्याला चांगलं माहिती होतं की दारू पिऊन गाडी चालवली तर कुणाचाही जीव जाऊ शकतो.
एका श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने गाडी चालवणे गंभीर समस्या नाही का? अजित पवार अजूनही झोपलेले आहेत का?
येवल्यावाला म्हणतो की आम्ही ६० टक्के आहे. तू काय आम्हाला बधीर समजतो काय, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली.
डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत भीषण स्फोटातील मयतांच्या संख्येत वाढ झाली असून आता ही संख्या ११ झाली आहे.
लोकसभेला जास्त जागा निवडून आणण्याची ताकद असतानाही कमी जागा घेतल्या पण विधानसभेला मात्र कमी जागा घेणार नाही, असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी गुरुवारी दिला.
नाशिक आणि दिंडोरीमध्ये काही ठिकाणी कमी मतदान झालं. त्यामुळे गिरीश महाजनांनी बूथनिहाय अहवाल मागवला आहे.
पुणे अपघतातील कारची नोंदणी १८ मार्चला झाली होती परंतु, नोंदणीसह अन्य शुल्क १ हजार ७५८ रुपयांची रक्कम भरली नसल्याने प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीपात्रात एसडीआरएफची बोट उलटली. या दुर्घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. येथे त्याला 14 दिवस रहावे लागणार आहे.