- Home »
- national News
national News
मोठी बातमी! गुजरातमध्ये तब्बल 3300 किलो अंमली पदार्थ जप्त; 5 जणांना अटक
Gujarat Drugs : गुजरातचा समुद्र किनारा ड्रग्सचा आगार झाल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. या सागरी मार्गाने होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यात तपास यंत्रणांना अनेकदा यश आलं आहे. आताही अशीच धाडसी कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं केली आहे. गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डच्या मदतीने तब्बल 3 हजार 300 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात […]
Rajya Sabha : राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान; सपा-काँग्रेससह विरोधकांची वाढली ‘धाकधूक’
Rajya Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याआधी राज्यसभेतील रिक्त जागांसाठी निवडणूक (Rajya Sabha Election) होत आहे. या जागांसाठी आज मतदान होणार आहे. या मतदानासाठी आमदार विधिमंडळात येण्यास सुरुवात झाली असून थोड्याच वेळात मतदानास सुरुवात होणार आहे. 15 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यानंतर सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणीस […]
भाजपला ‘अब की बार 370 पार ‘अशक्य’, काँग्रेसचं ‘शतक’ हुकणार; प्रशांत किशोर यांचं भाकित काय?
Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली (Lok Sabha Election) आहे. फाटाफुटीने हैराण झालेल्या इंडिया आघाडीसाठी सध्या (INDIA Alliance) गुडन्यूज येत आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीनंतर हरियाणा, दिल्ली, गोवा, चंदीगड आणि गुजरात या राज्यांतही आघाडी झाली आहे. त्यामुळे भाजपसमोर आव्हान उभे राहताना दिसत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा 370 […]
आसाम सरकारचा मोठा निर्णय! मुस्लीम विवाह कायदा रद्द; UCC च्या दिशेने वाटचाल
Muslim Marriage Act : उत्तराखंड राज्याने मागील आठवड्यात समान नागरी कायद्याला ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर आता आसामनेही त्याच दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आसाम सरकारच्या मंत्रिमंडळाने काल (शुक्रवार) रात्री 1935 चा मुस्लीम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता येथून पुढे मुस्लीम विवाहाची नोंदणी विशेष विवाह कायद्याच्या अंतर्गत होईल. […]
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना लवकरच अटक होणार; ‘आप’ नेत्याच्या दाव्याने खळबळ!
Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना येत्या दोन ते तीन दिवसांत अटक होऊ शकते, असा खळबळजनक दावा दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. मंत्री भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेत हा दावा केला आहे. जर दिल्लीत काँग्रेस आणि आप यांच्यात आघाडी झाली तर केजरीवाल […]
Road Accident : कार दुभाजकावर धडकली; भीषण अपघातात महिला आमदाराचा मृत्यू
BRS MLA G. Lasya Nanditha Death : देशात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या अपघातात अनेकांचा जीव गेला आहे. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी तेलंगणातून (Road Accident) आली आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या भारत राष्ट्र समितीच्या आमदार जी. लास्या नंदिता (G. Lasya Nanditha) यांचा संगारेड्डी येथे अपघाती मृत्यू झाला. अमिनपूर मंडळ जिल्ह्यातील […]
मोठी बातमी! जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी CBI ची धाड
CBI Conducts Raid on Satyapal Malik : देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा सीबीआयने आज (CBI) जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्या घरासह 30 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. जम्मू काश्मीरमधील किरू (Jammu Kashmir) जलविद्यूत प्रकल्पाच्या कंत्राटांशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली […]
Farmer Protest : “चलो दिल्ली” मार्च स्थगित; आज टोलनाका बंद करणार शेतकरी
Farmer Protest : पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन आता (Farmer Protest) चिघळले आहे. केंद्र सरकाबरोबर चर्चा फिस्कटल्यानंतर काल शेतकरी संघटनांनी राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच सुरू केले. मात्र या आंदोलना दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांत संघर्ष उडाला. या संघर्षात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची अफवा उडाली. त्यामुळे आंदोलक प्रचंड संतापले आहेत. पंजाब हरियाणा सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. […]
अशोक चव्हाण, नारायण राणे अन् SM कृष्णा.. माजी मुख्यमंत्र्यांनीही सोडला काँग्रेसचा ‘हात’
Congress party : लोकसभा निवडणुका तोंडावर (Lok Sabha Election) आलेल्या असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला (Congress Party) जोरदार धक्के बसत आहेत. दिग्गज नेते ज्यांनी अनेक वर्ष पक्षात राहून राजकारण केलं, पक्ष वाढवला आणि मोठी पदे भूषवली तेच नेते एका मागोमाग एक काँग्रेसचा हात सोडत आहेत. नेते सोडून जात आहेत तरीही त्यांना थांबवण्याचे कोणतेही प्रयत्न […]
प्रख्यात कायदेतज्ज्ञ फली एस. नरिमन यांचं निधन; वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Fali S Nariman Passes Away : सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आणि प्रख्यात कायदेतज्ज्ञ फली एस. नरिमन (Fali S Nariman) यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या कार्यकाळात नरिमन देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर होते. त्यांना लिविंग लिजेंड या नावाने देखील ओळखले जाते. भारताच्या कायदा क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व […]