मोहन भागवत सांप्रदायाचे वारकरी पेड कीर्तनकार; अंधारेंचा हल्लाबोल

मोहन भागवत सांप्रदायाचे वारकरी पेड कीर्तनकार; अंधारेंचा हल्लाबोल

सोलापूर : सुषमा अंधारे यांनी अलीकडेच संत, वारकरी, वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या विधानांचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहे. यासंदर्भात सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्यावर टीका करणारे वारकरी सांप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत सांप्रदायाचे पेड कीर्तनकार आहेत, अशी टीका वारकरी संप्रदायाच्या आंदोलनावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

फडणवीस पंतप्रधान होतील, हे कळणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजत नाही, की भाजपाच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाचा पर्यायने देवेंद्रजींचा ट्रॅप आहे की 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे. भाजपाचा पक्ष वाढवायचा आणि थेट मोदींच्या पंतप्रधान पदावर दावा ठोकून कधी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील. हे कळणार नाही. अशी खोचक टिपणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पंढरपुरात केली.

माझ्या वक्तव्यासारखे सावरकरांनी श्री रविशंकर यांनी देखील लिहिले आहे त्यांना किंवा त्यांच्या विचाराची भूमिका घेणाऱ्या लोकांना संप्रदायिका प्रश्न का विचारत नाही. असा सवाल देखील यावेळी केला. तसेच पंतप्रधान मोदी हिंदुत्ववादी नाहीत हे सुब्रमण्यम स्वामींचे वक्तव्य गांभीर्यपूर्वक आणि विचार करण्यासारखे आहे. कारण स्वामी हे भाजपचे जुने जाणते नेते आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube