आईच्या निधनानंतर मोदी आजही सरकारी कार्यक्रमात सहभागी होणार

आईच्या निधनानंतर मोदी आजही सरकारी कार्यक्रमात सहभागी होणार

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा (हिराबेन मोदी) यांचं निधन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शुक्रवारी सकाळी ही माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले.

आईच्या निधनची बातमी कळताच मोदी तात्काळ अहमदाबादला रवाना झाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आईला श्रद्धांजली देत मुखाग्नी दिला. मात्र आईच्या निधनानंतर मोदी आजही सरकारी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आज अनेक सरकारी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.

विकास योजनांना लॉन्च करण्यासाठी ते पश्चिम बंगालला जाणार होते. मात्र आता ते या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सामिल होणार आहेत. हावड़ा कोलकातामध्ये वंदे भारत ट्रेन हिरवा झेंडा दाखवतील, रेल्वेचे इतर विकास काम आणि नमामि गंगे योजने अंतर्गत राष्ट्रीय गंगा परिषदेत सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान मोदींची काम करण्याची पद्धत आणि त्यांची दिनचर्या यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यादरम्यान आता आपल्या आईच्या निधनानंतर आजही पंतप्रधान मोदी आपल्या देशाप्रतिच्या कर्तव्याला प्राधान्य देत आईच्या निधनानंतर मोदी आजही सरकारी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube