आम्ही त्यांना थांबवू शकत नाही, पण त्यांनी संयम ठेवल्यास…; बावनकुळेंचं हर्षवर्धन पाटलांविषयी मोठं विधान

आम्ही त्यांना थांबवू शकत नाही, पण त्यांनी संयम ठेवल्यास…; बावनकुळेंचं हर्षवर्धन पाटलांविषयी मोठं विधान

Chandrasekhar Bawankule : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुक राजकीय नेत्यांकडून नव्या पर्यायांचा शोध घेतला आहे. सत्ताधारी महायुतीला अनेक मतदारसंघात धक्के बसत असल्याचं चित्र आहे. कागलचे भाजप नेते समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) हे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं. त्यापाठोपाठ भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे देखील हाती तुतारी घेणार असल्याची चर्चा आहे. यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी भाष्य केलं.

SL Vs NZ 2024 : 5 दिवस नाही, श्रीलंका – न्यूझीलंडमधील पहिला कसोटी सामना चालणार 6 दिवस, ‘हे’ आहे कारण 

त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाहीत. मात्र, थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल, असं बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी विचारले असता ते म्हणाले, महायुतीमध्ये ज्या विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे जातील, त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीत लढलेले आमचे नेते आहेत. मात्र, त्यांना थांबायचं नाही. शेवटी, त्यांनी थांबावं अशी आमची इच्छा आहे. आमची त्यांना विनंती आहे. मात्र, शेवटी त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांन थांबवू शकत नाही, असं बावनकुळे म्हणाले.

महिला, मुलींची छेड काढताना आढळल्यास धिंड काढा…; मंत्री शंभूराज देसाई संतापले 

पुढं ते म्हणाले, आता महाविकास आघाडीचे अनेक नेते आहेत की, ते तिकडून आमच्याकडे येणार आहेत. मग याचा अर्थ असा नाही की, त्यांना तिकीट मिळेल. माझं म्हणणं असं आहे की, थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल, असं म्हणत बावनकुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना सल्ला दिला.

इंदापूरची जागा अजितदादांकडे जाणार?
विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूरच्या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. या जागेवरून हर्षवर्धन पाटील निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जातंय. मात्र, महायुतीत ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. कारण सध्या येथे अजित पवार गटाचे दत्ता भरणे हे आमदार आहेत. त्यामुळे भाजपला इंदापुरची जागा मिळण्याची शक्यता नाही. म्हणून हर्षवर्धन पाटील हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube