आदित्य बाळाने बाळासारखंच वागावं, राणेंचा शेलक्या शब्दांत सल्ला

आदित्य बाळाने बाळासारखंच वागावं, राणेंचा शेलक्या शब्दांत सल्ला

आदित्य ठाकरेंना मी बाळ समजतो, बाळाने बाळासारखंच वागावं, अशा शेलक्या शब्दांत सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला आहे. दरम्यान, फडतूस प्रकरणी भाजपच्या नेत्यांकडून ठाकरे पिता-पुत्रांवर ताशेरे ओढले जात आहेत. त्यातच आता नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

NZ vs SL : न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची झाली पळता भुई

नारायण राणे म्हणाले, मातोश्रीचे सर्व दरवाजे मला माहित आहेत. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीचे दरवाजे, गेट कुठे आहे हे तरी माहित आहे काय? असा सवाल उपस्थित करीत नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंचा ‘बाळ’ असा उल्लेख केला आहे.

‘बलोच’मध्ये दिसणार मराठ्यांची शौर्यगाथा, प्रवीण तरडेंच्या मोशन पोस्टरने वेधले लक्ष

आदित्य ठाकरेंना मी बाळ समजतो. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी बाळासारखंच वागावं, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला असून पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर फारसं भाष्य केलं नसून काही गोष्टी मला सांगायला लावू नका नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात तोंड दाखवायलासुद्धा जागा राहणार नसल्याचं राणेंनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, सध्या राज्यभरात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचं आयोजन केलं जात आहे. या सभांना टार्गेट करुनही त्यांनी हल्लाबोल केला आहे. आता इथून पुढे उद्धव ठाकरेंनी सर्व काही थांबवावं, ते जिथं सभा घेतील, तिथं काही प्रकार घडला तर त्याच्या परिणामांना त्यांनी सामोरं जावं लागणार असल्याचा सज्जड दमही यावेळी राणेंनी भरला आहे.

‘झुकेगा नही घुसेगा डॉयलॉग भारीच’ पण, एक बाई तुमच्या घरात.. सुषमा अंधारेंचा फडणवीसांना सवाल

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube