मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ‘त्या’ पोलिसांचे कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ‘त्या’ पोलिसांचे कौतुक

पुणे : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एक तरुण हातात कोयता घेऊन दुकानांसह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी घटनास्थळी पोलिसांनी दाखल होताच फिल्मी स्टाईलने पाठलाग करत तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, या तरुणावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड लॉ कॉलेज रोडवर 28 डिसेंबर दोन तरुणांनी हातात चाकू सुरे घेऊन परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांना भोसकले. रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखवली जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात एक जण जखमी देखील झाला आहे. जखमी झालेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी या दोघांना पाठलाग करुन पकडले. मात्र, यातील एकाने पळ काढला. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो अल्पवयीन असल्याचे समजते तर दुसऱ्या आरोपीचे नाव करण दळवी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगच्या दहशतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सुरुवातीला हडपसर परिसरात कोयता गॅंगची दहशत होती.

त्यानंतर सिंहगड पोलीस ठाण्याच्या मार्शल धनंजय पाटील व अक्षय इंगवले या पोलिसांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एक तरुण हातात कोयता घेऊन दुकानांसह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी घटनास्थळी पोलिसांनी दाखल होताच फिल्मी स्टाईलने पाठलाग करत तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, या तरुणावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube