सामना अनिर्णित अन् ‘हा’ दिग्गज कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; 16 वर्षांच्या करिअरला फुलस्टॉप!

Angelo Mathews Retirement : बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामना (Sri Lanka vs Bangladesh) अनिर्णित राहिला आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशी श्रीलंकेला 295 धावांचे टार्गेट मिळाले होते. पाचव्या दिवशी श्रीलंकेने चार विकेट्सच्या मोबदल्यात 72 धावा केल्या. परिणामी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यानंतर श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू एंजेलो मॅथ्यूजने कसोटी (Angelo Mathews Retirement) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या अखेरच्या कसोटी सामन्यात मॅथ्यूजने फक्त 8 रन केले. मॅथ्यूजने एकूण 119 कसोटी सामन्यांत 8 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी (Test Cricket) सामना हा माझा शेवटचा कसोटी सामना असेल अशी घोषणा मॅथ्यूजने आधीच केली होती. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने 39 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याला फक्त 8 धावा करता आल्या. यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कार्यक्रमात मॅथ्यूज भावूक झाला होता.
तो म्हणाला, हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. यात मी अनेक चढ उतार अनुभवले. माझ्या सहकाऱ्यांनी मला जो पाठिंबा दिला त्या बळावरच आज मी इथपर्यंत पोहोचलो. आता क्रिकेटमधील सर्वात बेस्ट फॉरमॅटमधून मी निवृत्त होत आहे. मला टेस्ट क्रिकेट सर्वाधिक आवडलं. आता वेळ आली आहे की संघात युवा खेळाडू त्यांची जबाबदारी ओळखतील आणि श्रीलंका क्रिकेटला पुढे घेऊन जातील.
भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! महामु्काबला ठरला; ICC कडून टी20 विश्वचषकाची घोषणा
एंजेलो मॅथ्यूजचे कसोटी करिअर
एंजेलो मॅथ्यूजने सन 2009 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने एकूण 119 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 8 हजार 214 धावा केल्या आहेत. यामध्ये 16 शतके तर 45 अर्धशतकांचा समावेश आहे. मॅथ्यूजने एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये नाव कमावलं आहे. कसोटीत गोलंदाजी करताना त्याने 33 विकेट्सही घेतल्या आहेत.