‘दारू नको, दुध प्या’ स्वराज्य संघटनेचा अभिनव उपक्रम

‘दारू नको, दुध प्या’ स्वराज्य संघटनेचा अभिनव उपक्रम

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने पुणे शहरातील बालगंधर्व चौकात अनोखा उपक्रम घेण्यात आला. जुन्या वर्षाची सांगता व नविन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण युवक मद्यपान करतात. मद्यपान केल्याने अनेकांना आरोग्याचे प्रश्न उदभवत असतात. नवी वर्षाची सुरवात नविन संकल्प करुन केली जाते त्यामुळे स्वराज्य च्या वतीने पुणे शहरात दारू नको, दुध प्या उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत जवळपास 200 लीटर मसाला दुधाचे वाटप करण्यात आले, येणा जाणाऱ्या वाहनचालकांना दूध देण्यात आले. ‘दारू नको, दुध प्या’, आपण आपले आरोग्य जपुया , स्वराज्य संघटनेचा विजय असो, दारूला नकार, दुधाला होकार अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

तरुणांचे व्यसनाकडे झुकण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता, सर्वांचेच आरोग्य व्यवस्थीत राहण्यासाठी दुध सेवन महत्वाचे आहे तसेच व्यसनमुक्तीसाठी सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत, स्वराज्यचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.

यावेळी स्वराज्यचे निमंत्रक गणेश सोनवणे, निखील काची, अमोल वीर, विनोद परांडे ,दिनेश कदम, द्वारकेश जाधव, गौतम जाधव, राजू फाले, समीर वीर, अजय बांडे, प्रणय शेंडे, लक्ष्मण वडणे, विक्रम कदम, सुभाष येनपुरे, गणेश गवळी, सोन्या शितोळे, शैलेश तारडे, किशोर दाताळ यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube