Mumbai Accident : लालबागमध्ये भीषण अपघात, मद्यधुदं प्रवाशाने स्टेअरिंग हिसकावल्याने अनियंत्रित बसने 9 जणांना चिरडलं..

  • Written By: Published:
Mumbai Accident : लालबागमध्ये भीषण अपघात, मद्यधुदं प्रवाशाने स्टेअरिंग हिसकावल्याने अनियंत्रित बसने 9 जणांना चिरडलं..

Lalbaug Bus Accident : मुंबईत एका भीषण बस (Mumbai Accident) अपघाताची घटना समोर आली. भरधाव वेगात असलेल्या बसने 9 जणांना चिरडले. ही घटना रविवारी रात्री लालबाग परिसरात घडली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य आठ जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर लालबाग परिसरात एकच गोंधळ उडाला. एका द्यधुंद प्रवाशाने चालकाशी वाद घालून बेस्ट बसचे स्टेअरिंग हिसकावल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

Pune Crime :पुणे हादरले! हडपसरमध्ये फायनान्स कंपनीच्या मॅनजेरची निर्घृण हत्या, 12 तासात दोन खून…. 

बेस्टची 66 क्रमांकाची बस लालबागमध्ये गेल्यानंतर बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशाने चालकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यानंतर प्रवाशाने चालकाचे स्टेअरिंग हिसकावून घेतलं, त्यामुळे बस अनियत्रंत्रित होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्या नऊ पादचाऱ्यांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) उपक्रम ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची वाहतूक शाखा आहे. मद्यधुंद प्रवाशाने केलेल्या कृत्यामुळे बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि शहरातील लालबाग परिसरात पादचारी, कार आणि दुचाकींची धडक झाली. काळाचौकी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथून एक इलेक्ट्रिक बस सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात असतांना ही घटना घडली.

Horoscope Today : आजचे राशी भविष्य,’वृषभ’ राशीच्या लोकांनी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये 

अधिकाऱ्यांना सांगितले की, बस क्रमांक 66 राणी लक्ष्मी चौकाकडे जात होती. या बसमधून एक मद्यधुंद प्रवासी प्रवास करत होता. त्यानंतर तो प्रवासी बसमधील चालकाशी हुज्जत घालत होता. गणेश टॉकीजदरम्यान त्या मद्यधुंद प्रवाशाने चालकाशी झटापट केली. त्यामुळे वाहकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस अनित्रयंत्रित होऊन फुटपाथच्या दिशेनं गेली. नियंत्रित बसनं दोन मोटारसायकल, एक कार आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे या दरम्यान, फूटपाथवरून जाणारे काही पादचारी जखमी झाल्याचं समजलं आहे. बसमधील मद्यधुंद प्रवाशाला पोलिसांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेतील तीन जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube