Download App

Letsupp Special रामदासभाईंनी अनिल परबांसाठी खड्डा खोदला पण सख्खा भाऊच अडकला!

  • Written By: Last Updated:

पुणे : राजकारणातील फासे कधी उलटे पडतील हे सांगता येत नाही. आपल्यालाच किंवा आपल्या निकटवर्तीयाला  त्यात अडकावे लागेल का, याची शाश्वती देता येत नाही. माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam Vs Anil Parab) यांना सध्या हाच अनुभव आला आहे. त्यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील रिसाॅर्टच्या विरोधात रान पेटवले होते. मात्र हे रिसाॅर्टची कागदोपत्री मालकी त्यांचे बंधू सदानंद कदम यांच्याकडे होते. (ED takes action against Sadanad Kadam) अंमलबजावणी संचालनालयाने अनिल परब यांच्याविरोधात कारवाईसाठी पावले टाकली. पण कागदोपत्री सदानंद हे मालक असल्याने पहिल्या टप्प्यात त्यांनाच अटक करण्यात आली. रामदास आणि सदानंद हे दोघे सख्खे भाऊ आहेत. सदानंद यांचे रामदास यांच्यासोबत सख्य नाही. त्यामुळे ते अनिल परब यांच्यासोबत अनेक व्यवहारांत असल्याचे बोलले जाते. त्यातून त्यांना ही अटक झाली.

Ramdas Kadam : माझ्या विरोधात उद्धव ठाकरेंनी कारस्थान रचलं

रामदास कदम यांना एकूण चार भाऊ आणि एक बहीण आहे. सदानंद हे यातील सर्वात धाकटे. पण अनेक कुटुंबात भाऊबंदकी असते, तशीच ती कदम यांच्याही कुटुंबात आहे. मुंबईत केबल व्यवसायात असलेले सदानंद हे कालांतराने रामदास कदम यांच्याविरोधात गेले. त्यांची राजकीय महत्वाकांक्षा कधी उघडपणे दिसून आली नाही. दोघा भावांमध्ये जाहीर टीकात्मक वक्तव्ये पण झाल्याचे अद्याप दिसून आलेले नाही. पण सदानंद हे केबल व्यवसायात असल्याने त्यांचे परब यांच्यासोबत घनिष्ठ संबंध झाले. परब हे मुंबईतील केबल नेटवर्कचे किंग समजले जातात. हेच परब  रत्नागिरीचे पालकमंत्री झाल्यानंतर रामदास कदम यांच्याविरोधात राजकीय कुरघोडी करत असल्याचा आक्षेप नंतर रामदास कदम समर्थकांकडून घेण्यात आला. त्यातून या दोघांत वाद सुरू झाला. रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या कथित मालकीच्या रिसाॅर्टची कागदपत्रे सोमय्यांकडे पोहोचविल्याचा आरोप राजकीय वर्तुळात होत असतो. ही कागदपत्रे मागविणारी कदम यांची एक क्लिपही व्हायरल झाली होती. पण हे रिसाॅर्ट कागदोपत्री सदानंद यांच्या मालकीचे असल्याचे पुढे निष्पन्न झाले.

Sai Resort प्रकरणावर अनिल परब थेट सभागृहातच बोलले…

शिवसेनेतील फुटीनंतर रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. मातोश्रीवर हल्ला करण्यात तेच पुढे राहिले. त्यातून कदम यांची राजकीय कोंडी करण्यासाठी आणि त्यांच्याविरोधातील वातावरण तापविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी खेड (जि. रत्नागिरी) येथे सभा घेतली. या सभेची तयारीची जबाबदारी सदानंद यांच्यावर होती. तसेच शिवसेनेतील बड्या नेत्यांच्या व्यवस्था त्यांच्या मालकीच्या दुसऱ्या रिसाॅर्टवर करण्यात आली होती. ठाकरे यांना पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका सदानंद यांनी घेतल्यानंतर तीन दिवसांतच त्यांना ईडीने अटक केली. त्यांच्या या अटकेवर रामदास कदम आणि योगेश कदम यांनी संयमी प्रतिक्रिया व्यक्त करत खऱ्या आरोपींवर कारवाईची मागणी केली. दुसरीकडे अनिल परबांच्या विरोधात कारवाईसाठी लढणाऱ्या किरीट सोमय्या यांनी परब यांनाही लवकर अटक होणार असल्याचा इशारा दिला. या वादाचे पडसाद विधान परिषदेत उमटले आणि परब यांनी सोमय्या यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. एका लोकप्रतिनिधीला वारंवार बदनाम केले जात असल्याचा ठपका परब यांनी सोमय्या यांच्यावर ठेवला आहे.

Anil Parab : ईडीला संपूर्ण सहकार्य करूनही कदम यांना अटक, सोमय्यांच्या आदेशावर ईडी चालते का?

Tags

follow us